लग्नाचे आमीष दाखवत आपल्यावर बलात्कार झाल्याने एका 19 वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील (Maharashtra) पालघर (Palghar) जिल्ह्यात घडली आहे. मात्र, आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या पीडिताची पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली नाही. याशिवाय पोलिसांनी पीडित तरुणीचा तिरस्कार करून तिचा अपमान केला. यानंतर तिने घरी गेल्यानंतर गळफास लावून आत्महत्या केली, असा आरोप पीडितांच्या नातेवाईकांनी केला आहे. यामुळे याप्रकरणाची अधिक चौकशी केली जाईल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून आपल्या एका मित्राच्या घरी घेऊन गेला होता. दरम्यान, आरोपीने अनेकदा तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने पीडिताला लग्नाचे वचन दिले होते. पंरतु, पीडिताने लग्नाचा विषय काढला की, आरोपी तिला लॉकडाउनचा कारण देऊन हा विषय टाळत असे. यामुळे पीडित तरुणीने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. पीडिताच्या मृतदेहाजवळ पोलिसांना सुसाइड नोट देखील सापडली आहे. ज्यात आरोपीने तिला लग्नासाठी दिल्याने ती आत्महत्या करत असल्याचे लिहले गेले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यानंतर 15 सप्टेंबर रोजी तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. हे देखील वाचा- Husband Kills Wife: चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या करून पतीने मृतदेह पुरला शेतात; बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील घटना
परंतु, ज्यावेळी पीडित तरूणी आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आली असताना पोलिसांनी तिचा अपमान केला. ज्यामुळे ती नैराश्यात गेली आणि आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलेले, असा आरोप पिडिताच्या नातेवाईकांनी केला आहे. याप्रकरणी अधिक चौकशी करण्याचे आदेश एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत.