Image used for represenational purpose (File Photo)

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना बुलढाणा (Buldhana) येथील नांदुरा (Nandura) तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून त्याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने मृत महिलेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करत तिची हत्या केली. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्याने पत्नीचा मृतहेद शेजारच्या एका शेतात पुरला. मात्र, रविवारी शेतातून दुर्गंधी येत असल्याने गावातील एका व्यक्तीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. याघटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

समाधान तुकाराम तायडे असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. समाधान हा पत्नी जाईबाई आणि मुलगा संघपाल यांच्यासह जिगाव येथे राहत होता. परंतु, समाधान हा आपली पत्नी जाईबाईवर संशय करायचा. यातूनच समाधानने कुऱ्हाडीने वार करत जाईबाईची हत्या केली. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने मृतहेत दीपक उगले यांच्या शेतात नेऊन पुरला. मात्र, दुर्गंधी येत असल्याने शेताची पाहणी केली. त्यावेळी त्यांना एका जाईबाई यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले. नांदुरा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून मृतदेहाचा पंचनामा केला. यासंदर्भात अधिक चौकशी करत पोलिसांनी आरोपी समाधानला अटक केली, अशी माहिती लोकमतने आपल्या वृत्तात दिली आहे. हे देखील वाचा- 1-Year-Old Girl Dies After Fall From Balcony: धक्कादायक! पहिल्या वाढदिवसाचा केक कापणाऱ्या एका चिमुकलीचा गॅलरीतून पडून दुर्देवी मृत्यू; पुण्यातील सिंहगड रोड परिसरातील घटना

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आले आहे. ज्यामुळे गुन्हेगारीच्या घटनेत बरीच घट झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अनलॉकसह गुन्हेगारीने देखील डोके वर काढले आहे. यात वरील घटनेने आणखी भर घातली आहे.