Balasaheb Thackeray Birth Anniversary: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज 95 वी जयंती साजरी होत आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, अनिल देशमुख, सुप्रिया सुळे, अजित पवार, धनंजय मुंडे, आदी नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून विनम्र अभिवादन केलं आहे. लोकांच्या कल्याणासाठी बाळासाहेबांनी अथक परिश्रम घेतले. त्यांचा आदर्श आजही कायम आहे, असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. तसेच शिवसेना आणि भाजपमधील टीकेचं राजकारण सुरू असताना आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं ट्विट सर्वत्र चर्चेचा विषय ठरलं आहे. फडणवीस यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’ असा केला आहे. (वाचा - बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा)
पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट -
Tributes to Shri Balasaheb Thackeray Ji on his Jayanti. He was unwavering when it came to upholding his ideals. He worked tirelessly for the welfare of people.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
देवेंद्र फडणवीस ट्विट -
आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ! pic.twitter.com/UZVGB7NdnA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
अजित पवार ट्विट -
महाराष्ट्राची अस्मिता, मराठी माणसाचा स्वाभिमान व महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कासाठी जीवनाच्या अखेरपर्यंत संघर्ष करणारे शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 23, 2021
अनिल देशमुख ट्विट -
अमोघ वाणी, रोखठोक भूमिका आणि धारदार भाषण शैलीतून मराठी माणसांच्या हृदय सिंहासनावर कायम आरुढ राहिलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! pic.twitter.com/8X9B824k5u
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 23, 2021
सुप्रिया सुळे -
शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती... राजकारणापलिकडेही त्यांनी स्नेहबंध जपले. तळागाळातील माणसं त्यांनी राजकारणात आणून मोठी केली. त्यांच्यातील कलाकार देखील नेहमी जागा राहिला.अशा या बहुविध व्यक्तीमत्त्वाच्या धनी असणाऱ्या लोकनेत्यास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/Y78KgeQka9
— Supriya Sule (@supriya_sule) January 23, 2021
धनंजय मुंडे ट्विट -
आझाद हिंद सेनेचे संस्थापक, थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. pic.twitter.com/ftYbwoqJYH
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) January 23, 2021
दरम्यान, आज मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.