बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण; शरद पवार, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रंगणार सोहळा
मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात येणार आहे.
मुंबईतील श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. आज बाळासाहेबांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकापर्ण करण्यात येणार आहे. या सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थित हा सोहळा रंगणार आहे. या निमित्ताने राज्याचे सर्व प्रमुख नेते एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री आदित्य ठाकरे व अस्लम शेख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. (Balasaheb Thackeray Birth Anniversary Images: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त WhatsApp Messages, Wishes, Greetings शेअर करुन शिवसैनिकांना द्या खास मराठी शुभेच्छा!)
मुंबईत उभारण्यात आलेला बाळासाहेबांचा पुतळा 9 फूट उंचीचा असून त्यासाठी 1200 किलो ब्रॉंझ धातू वापरण्यात आला आहे. दोन फूट उंच हिरवळ आणि सुमारे 14 फूट उंचीच्या चौथऱ्यावर हा पुतळा बसवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईतील बाळासाहेबांचा हा पहिलाच भव्य पुतळा ठरणार आहे. प्रबोधन प्रकाशनाच्या वतीने या पुतळ्याची उभारणी करण्यात आली असून ज्येष्ठ शिल्पकार शशिकांत वडके यांनी हा पुतळा साकारला आहे. दरम्यान, संध्याकाळी 6 वाजता हा सोहळा रंगणार अूसन याचे ऑनलाईन प्रेक्षपण करण्यात येणार आहे.
मुंबईत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा असावा, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात येत होती. त्यासाठी पालिकेत 8 वर्षांपूर्वी प्रस्तावही मांडण्यात आला. मात्र हा पुतळा नेमका कोठे उभारावा, यात मतभेद होते. अखेर गेट वे ऑफ इंडिया येथील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इमारतीसमोर डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटात हा पुतळा उभारण्याचे ठरले, विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या 95 व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jan 23, 2021 11:41 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

