राज्यातील कोरना व्हायरस (Coronavirus) संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी होते आहे ही चांगली बाब आहे. असे असले तरी कोरनाचाच नवा स्ट्रेन आमायक्रोन (Omicron) हा जगासाठी चिंतेचा विषय ठरतो आहे. त्यात भारतामध्ये ओमायक्रोन संक्रमित रुग्णांची संख्या महाराष्ट्र आणि दिल्ली यांसारख्या राज्यांमध्ये अधिक आहे. महाराष्ट्रात हा नवा स्ट्रेन आता केवळ शहरांपुरता मर्यादीत राहिला नसून तो ग्रामीण भागातही शिरकाव (Omicron in Rural Areas of Maharashtra) करत आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्रासमोर हे नवे आव्हान उभा ठाकण्याची शक्यता आहे. पुणे (Pune District) जिलेह्यातील जुन्नर (Junnar) तालुक्यात ओमायक्रोन संक्रमीत सात नवे रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक म्हणजे या सात जणापैकी 5 जणांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले होते.
जुन्नर येथे ओमायक्रोन संक्रमित आढळलेले सातही जण यूएईवरुन परतले होते. 2 आणि 3 डिसेंबरला ते भारतात दाखल झाले होते. या सात जणांना ओमायक्रोन संसर्ग झाल्याचे आढळताच त्यांच्या संपर्कात आलेल्या 15 जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. त्यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आता अहवालाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, ग्रामिण भागातही ओमायक्रोन संसर्ग वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे.
शेवटची अद्ययावत माहिती हाती आली तेव्हा, महाराष्ट्रात आठ नवे ओमायक्रोन संक्रमित रुग्ण सापडले. आजघडीला राज्यात ओमायक्रोन संक्रमीत रुग्णांची संख्या 40 इतकी झाली आहे. देशामध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक ओमायक्रोन रुग्ण आहेत. यातील दिलासा देणारी बाबत इतकीच की ओमायक्रोन संक्रमित एकूण 40 रुग्णांपैकी 25 रुग्ण वैद्यकीय उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशातील एकूण ओमायक्रोन संक्रमितांची संख्या 109 इतकी झाली आहे. (हेही वाचा, Omicron: मुंबईत मॉल आणि रेस्टॉरंट मध्ये लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवल्यानंतरच मिळणार प्रवेश)
Spelling fresh concerns, #Maharashtra recorded 8 new cases of the #COVID19 variant #Omicron, taking the state's tally to 40 now, health officials said. pic.twitter.com/uyKaJPbl7D
— IANS Tweets (@ians_india) December 17, 2021
दरम्यान, भारतात पाठीमागील 24 तासात 7,145 जणांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला आहे. तर , 8,706 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 289 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती केद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशभरात सध्यास्थितीत सक्रीय कोरोना रुग्णांची 84,565 इतकी आहे. हा आकडा पाठिमागील 569 दिवसांतील सर्वात निचांक आहे. आतापर्यंत देशातील 3,41,71,471 जण उपचार घेऊन कोरोनातून बरे झाले आहेत. देशभरात आतापर्यंत 4,77,158 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 1,36,66,05,173 जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.