Mira-Bhayandar Shocker: भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण; Watch Video
Old woman beaten for feeding stray dogs (PC - Twitter)

Mira-Bhayandar Shocker: एका भटक्या कुत्र्याला निर्दयीपणे मारहाण करून त्याचा गळा दाबून खून केल्याचे प्रकरण ताजे असतानाचं भटक्या कुत्र्यांना (Stray Dogs) खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आल्याचे प्रकरण मीरा रोड (Mira Road) येथे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा रोड येथील लक्ष्मी पार्क परिसरातील वासुदेव प्लॅनेट कॉम्प्लेक्समध्ये शनिवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांना दिलेल्या जबाबात, ज्येष्ठ नागरिक शर्लिन स्मिथने सांगितले की, तिला चौकीदाराचा फोन आला ज्याने तिला खाली येण्यास सांगितले. कंपाऊंडमध्ये पोहोचल्यावर, तिला शिवीगाळ करण्यात आली. काही सदस्यांनी इमारतीच्या आवारात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही दिला. (हेही वाचा -Mira-Bhayandar Shocker! मीरा-भाईंदरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना; 3 जणांनी कुत्र्याचा गळा दाबून केली हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, Watch Video)

हा वाद इतका विकोपाला गेला की, यात वृद्ध महिलेला मारहाण करण्यात आली. दरम्यान या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धेची सोनसाखळीही हिसकावून घेण्यात आली. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. दोन वर्षांपासून पुरुष आरोपी तिचा पाठलाग करत असल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.

चौघांवर एफआयआर दाखल - 

दरम्यान, मीरा रोड पोलिस ठाण्यात तीन महिलांसह चार जणांविरुद्ध आयपीसी कलम-323, 354-डी, 504,506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.