Mira-Bhayandar Shocker! मीरा-भाईंदरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना; 3 जणांनी कुत्र्याचा गळा दाबून केली हत्या, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद, Watch Video
3 people strangle a dog to death (PC - Twitter)

Mira-Bhayandar Shocker: मीरा-भाईंदरमध्ये माणूसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सध्या सोशल मीडियावर मीरा रोड (Mira Road) येथील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या (Stray Dogs) सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भटक्या कुत्र्यावर हल्ला (Attack On Stray Dog) केल्याप्रकरणी एका प्राणी कार्यकर्त्याने मीरा रोड पूर्व कनक्य पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

या व्हिडिओमध्ये एका कुत्र्याला तीन जणांकडून निर्दयीपणे मारहाण करण्यात आल्याचं दिसत आहे. यातील एकाने कुत्र्याचा गळा दाबला. तर दुसऱ्या व्यक्तीने त्याला लाथाने मारहाण केली. मारहाणीनंतर कुत्रा गंभीर जखमी झाल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. एका स्थानिक यूट्यूब वृत्तवाहिनीने कुत्र्याला नियमित आहार देणाऱ्या फीडरची मुलाखत घेतली. फीडरनुसार, हल्ला होण्याच्या एक दिवस आधी हॉकी नावाच्या कुत्र्याला खूप ताप आला होता. त्यांना त्यांनी पशुवैद्यकाकडे नेले. फीडर त्याला अन्न आणि औषधे देऊन काळजी घेत होता. (हेही वाचा - Snake Viral Video: 15-फूट-लांब किंग कोब्राला सर्प मित्राने केलं रेस्क्यू; व्हिडिओ पाहून फुटेल तुम्हाला घाम, Watch)

कुत्रा आजारी असल्याने तो थोडा विक्षिप्त होता, असे फीडरने सांगितले. पण तो लवकर बरा होत होता. प्राणघातक हल्ल्याच्या दिवशी त्यांना कुत्रा सापडला नाही. नंतर त्यांना कुत्र्यावरील हल्ल्यासंदर्भात माहिती मिळाली. या हल्ल्यात तो गंभीर गंभीर जखमी झाला.

या कुत्र्याला तातडीने स्थानिक पशुवैद्यकीय डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले. दुर्दैवाने, त्याला क्लिनिकमध्ये मृत घोषित करण्यात आले. स्थानिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली. फीडरने परिसरातील एका कॅमेऱ्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासले ज्यात हल्ल्याची भीषणता दिसून येत आहे. कुत्र्याला काठीने मारहाण केल्याने त्याचा डोळा खराब झाला. तसेच यातील एका हल्लेखोराने कुत्र्याचा गळा दाबला आणि नंतर त्याने कुत्र्याला दोरीने खांबाला बांधले.

दरम्यान, या घटनेने प्राणी कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून या कुत्र्याला न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे. हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणीही फीडरने त्याच्या तक्रारीतून केली आहे.