OBC Reservation: ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकार जबाबदार, 26 जून रोजी भाजप आंदोलन करणार
पंकजा मुंडे (Photo Credits: Youtube)

OBC Reservation: भाजप पक्षाच्या महासचिव पंकजा मुंजे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार टीका केली आहे. कारण राज्यातील ओबीसी आरक्षण रद्द होण्यासाठी राज्य सरकार जबाबदार असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय झाल्याचे ही मुंडे यांनी म्हटले. याच मुद्द्यावरुन आता येत्या 26 जून रोजी संपूर्ण राज्यभरात सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.(Congress: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात इंधन दरवाढ, महागाई विरोधात आंदोलन) 

महाविकास आघाडी सरकारच्या चुकांमुळेच ओबीसीचे आरक्षण रद्द झाले. यामुळे राज्य सरकारला धडा शिकवण्यासाठी येत्या 26 जबव रोजी चक्काजाम करणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. ओबीसी आरक्षणासंदर्भात  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक पार पडली. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषदत घेत ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्यासंदर्भात आंदोलन करणार असल्याची घोषणा केली आहे.

पंकजा मुंडे यांनी या आंदोलनासंदर्भात एक ट्विट केले आहे. त्यात असे म्हटले की, बैठक पार पडली वंचितांच्या लढाई ची सुरुवात 26 जून छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मदिवशी सुरू होईल राजकीय आरक्षण OBC चे परत मिळविण्यासाठी लढणार हा निश्चय झाला. OBC संघटनांशी बैठक पार पडली विविध समाजांनी पाठिंबा जाहीर केला आणि 26 जून च्या चक्का जाम मध्ये सहभागी होणार हा निश्चय केला.(सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात बैठक पूर्ण, अजित पवार यांनी 13 मागण्या पूर्ण केल्याची संभाजीराजे छत्रपती यांची माहिती)

Tweet:

पंकजा मुंडे यांनी पुढे असे म्हटले की, ओबीसी समाजाचा इम्पिरिकल डेटा तयार झाल्याशिवाय राज्यात निवडणूका पार पाडू देणार नाही. तर राज्य सरकाने ओबीसींच्या भविष्याचा खेळ खंडोबा केला आहे. तर राज्य सरकारकडून दिशा भूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इम्पिरिकल डेटा आणि केंद्राचा कोणताही संबंध नाही असे ही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.