सारथी संस्थेच्या अडचणी संदर्भात बैठक पूर्ण, अजित पवार यांनी 13 मागण्या पूर्ण केल्याची संभाजीराजे छत्रपती यांची माहिती
Sambhaji Chhatrapati | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)  आणि खासदार संभाजीराजे छत्रपती (MP Sambhajiraje Chhatrapati) यांच्यामध्ये आज एक महत्वपूर्ण बैठक पार पडली आहे. या बैठकीदरम्यान सारथी संस्थेच्या (Sarthi Sanstha) अडची संदर्भातील काही मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी राज्य सरकारकडून 13 मागण्या मान्य केल्याची माहिती संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. अजित पवार आणि संभाजीराजे यांच्यामध्ये ही बैठक नवीन सर्किट हाउस येथे पार पडली. बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे काही समन्वयक यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती.

सारथी संस्थेला स्वायत्तता दिली गेली आहे. त्यांच्या 13 मागण्या आज राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. त्यानुसार सारथी संस्थेची 8 विभागीय कार्यालये तयार केली जाणार असून पहिले कार्यालय कोल्हापूरात असणार आहे. तर जाणून घ्या राज्य सरकारने सारथीच्या कोणत्या 13 मागण्या पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे त्याबद्दल अधिक माहिती.(Shivsena 55th Anniversary: भाजप सदस्यत्वाचे ओळखपत्र दाखवल्यास प्रत्येकी 1 लीटर पेट्रोल मोफत; शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपक्रम, वाचा सविस्तर)

Tweet:

दरम्यान, कोरोना व्हायरसच्या संकटकाळात आर्थिक अडचणीत असल्याने सरकार सारथी संस्था बंंद करणार अशाही अफवा मध्यंंतरी पसरल्या होत्या, यावर मागेच अजित पवार यांंनी उत्तर देत, कोणत्याही परिस्थितीत सारथी संस्था बंद केली जाणार नाही असे सांंगितले होते. सारथी संस्था ही मराठा, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा, कुणबी समुदाय यांंना सामाजिक-आर्थिक, शैक्षणिक,शेती विषयी विकास करण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम करते