Ambabai Temple Kolhapur (Photo Credit: mahalaxmikolhapur.com)

महाराष्ट्रामध्ये कोविड 19 चं संकट आता आटोक्यामध्ये आलं आहे. रूग्णसंख्येमध्ये घट झाल्याने अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. दरम्यान पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती (Paschim Maharashtra Devasthan Samiti) कडून देखील आता देवदर्शनासाठी ऑनलाईन ई पास ची अट शिथिल करण्यात आली आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची करवीरनिवासिनी महालक्ष्मी (Mahalaxmi Mandir) आणि जोतिबा मंदिरामध्ये (Jyotiba Mandir) आता दर्शनासाठी ई पासची (E Pass) आवश्यकता नसल्याचं म्हटलं आहे.

दरम्यान भाविकांची होणारी गैरसोय आणि काही तक्रारी येत असल्याने ही ई पासची अट हटवण्यात आल्याचं पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे शिवराज नाईकवडे यांनी सांगितलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाईच्या मंदिरात 7 ऑक्टोबर 2021 दिवशी ई पास दर्शन पद्धती सुरू करण्यात आली होती. हे देखील नक्की वाचा: शिर्डी च्या साईबाबा मंदिरामध्ये काकड आरती, शेजारतीच्या वेळेत होणार बदल; 1 मार्चपासून नवे वेळापत्रक .

नुकत्याच जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये महालक्ष्मी मंदिरासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये मंदिर परिसरामध्ये विकास करण्याचा मानस राज्य सरकारचे आहे. भक्तनिवास, बहुमजली पार्किंग सेवा, दर्शनमंडपाची डागडुजी होणार आहे.

कोविड संकट काळात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यासाठी अनेक मोठ्या मंदिर प्रशासनांनी भक्तांना ऑनलाईन दर्शन खुले केले होते. तर थेट दर्शनासाठी देखील भाविकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली होती. अनेक ठिकाणी फुलं, हार, प्रसाद घेऊन जाण्यास प्रतिबंध होती. पण आता यामध्ये हळूहळू शिथिलता देण्यात येत आहे.