साईभक्त व ग्रामस्थांकडून शिर्डी (Shirdi) येथील साईबाबांच्या मंदिरात (Sai Baba Mandir) काकड आरती (Kakad Aarti) व शेजारती (Shejarti) वेळ पूर्वीप्रमाणे करावी अशी वारंवार मागणी होत होती अखेर त्या मागणीची पूर्तता झाली आहे. साई मंदिरामध्ये पूर्वीप्रमाणे पहाटे साडे पाच वाजता काकड आरती आणि रात्री 10 वाजता शेजारती होणार आहे. आरत्यांच्या वेळांमधील बदलांमुळे आता साईबाबा मंदिरात बाबांच्या इतर विधींचेदेखील वेळापत्रक बदलणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान 2008 साली गुढीपाडव्यापासून साईबाबांच्या मंदिरात काकड आरतीच्या वेळेत बदल करुन पहाटे साडेचार व रात्री साडे दहा वाजता शेजारती असे बदल करण्यात आली होते. पण आता ते पूर्ववत होणार आहेत. नवं वेळापत्रक 1 मार्च महाशिवरात्रीपासून अंमलात आणले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही बाबांच्या दर्शनाला जाणार असाल तर नव्या वेळापत्रकाचं भान ठेवण्याचं आवाहन करण्यात आले आहे. हे देखील नक्की वाचा: Pune-Shirdi-Nagpur Flight: पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; 18 फेब्रुवारीपासून सुरु होणार पुणे-शिर्डी-नागपूर दैनंदिन विमानसेवा.
कसे असेल साईबाबा मंदिरामधील नवं वेळापत्रक
पहाटे 4.45 - मंदिर खुले होईल
पहाटे 5.00 - भुपाळी रेकॉर्ड सुरू
पहाटे 5.15 - काकड आरती सुरू
सकाळी 5.50- मंगलस्नान व त्यानंतर शिर्डी माझे पंढरपूर ही आरती
सकाळी 6.25 - दर्शनाला सुरूवात
दुपारी 12.00- माध्यान्ह आरती
सूर्यास्ताच्या वेळी धुपारती
रात्री 10.00 - शेजारती
रात्री 10.45- मंदिर बंद होईल
शिर्डीच्या साईबाबा मंदिरामध्ये गुरूपौर्णिमा, राम नवमी, गुढी पाडवा निमित्त भाविकांची तोबा गर्दी असते. काही भाविक हमखास दर गुरूवारी साईबाबांच्या दर्शनाला येतात. मात्र कोविड संकटामुळे मध्यंतरी भाविकांच्या संख्येवर प्रशासनाने मर्यादा घातली आहे.