AC local trains (Photo Credit: PTI)

रविवार म्हटलं की, मुंबईकर आगोदर लोकलचे वेळापत्रक पाहतो. त्याचे कारण म्हणजे रविवार आणि मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock) यांचे घट्ट नातेच जणू. हा रविवार मात्र अपवाद ठरणार आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक (Mega Block) घेतला जाणार नसल्याचे सेंट्रल रेल्वेने म्हटले आहे. सेंट्रल रेल्वेने (Central Railway) माहिती देताना सांगितले आहे की, सध्या गणेशोत्सव (Ganesh Chaturthi 2022) सुरु आहे. त्यामुळे गणेशभक्त दर्शनासाठी प्रवास करतात. त्यामुळे मुंबईकर नागरिक आणि गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी येत्या रविवारी म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याचे सेंट्रल रेल्वेने म्हटले आहे.

सेंट्रल रेल्वेने याबाबत ट्विट करुन दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने मेगॉब्लॉक न घेण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रत्येक रविवारी दुरुस्ती आणि तांत्रिक कारणांमुळे मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, गणेशोत्सव काळात नागरिकांना त्रास होऊ नये यासाठीच हा मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याचे रेल्वेने म्हटले आहे. (हेही वाचा, Lalbaugcha Raja 2022 : 'लालबागच्या राजाच्या नवसाच्या रांगेत बसण्याची व्यवस्था करा' दिवंगत लेकीची शेवटची आठवण शेअर करणारं माऊली चं जीवाला चटका लावणारं पत्र वायरल!)

गणेशोत्सव काळात मेगाब्लॉक घेतला जाणार नसल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात सुट्ट्या असतात. रविवार तर हक्काची सुट्टी. त्यामुळे नागरिक नातेवाईक, आप्तेष्ठ यांकडे उत्सवासाठी जातात. तसेच, घरच्या गणपतींचे विसर्जन झाल्याने विविध मंडळांनी बसवलेले गणपती पाहण्यासही लोक गर्दी करतात. त्यामुळे रविवारी हे नागरिक प्रवासास प्राधान्य देतात. अशा वेळी जर मेगाब्लॉक घेतला तर या नागरिकांना प्रवासावर मर्यादा येतात. रस्तेवाहतुकीचा पर्याय निवडायचा तर वाहतुक कोंडीत अडकण्याची शक्यता असते. त्यामुळे रेल्वे प्रवासाशिवाय पर्याय उरत नाही.