
नवी मुंबई महानगर पालिकेकडून (Navi Mumbai MahanagarPalika) थेट भरती प्रक्रियेसाठी घेण्यात येणार्या परीक्षेच्य तारखा आता जाहीर करण्यात आल्या आहेत. 668 जागांसाठी ही नोकरभरती होणार आहे. यासाठीच्या परीक्षा 16,17,18,19 जुलै 2025 दिवशी होणार आहेत. या परीक्षांचे अॅडमीट कार्ड (Admit Card) नवी मुंबई महापालिकेची वेबसाईट www.nmmc.gov.in वर परीक्षेच्या 7 दिवस आधी मिळणार आहे. या नोकर भरतीसाठीची अधिकृत जाहिरात 27 मार्च 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. अर्ज करण्याची अंतिम मुदत 28 मार्च 2025 ते 19 मे 2025 दरम्यान होती.
नवी मुंबई मधील नोकर भरतीच्या परीक्षेचं वेळापत्रक पहा इथे!
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता पासून स्टाफ नर्स/नर्स मिडवाइफ, आहार तंत्रज्ञ अशा विविध पदांसाठी नोकरभरती होणार आहे. यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र इंटरव्ह्यू नसेल अशी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान परीक्षा शुल्क खुला वर्गासाठी 1000 आणि राखीव वर्गासाठी 900 रूपये आहे. या नोकर भरती मधून गट क आणि गट ड मध्ये लोकांना नोकरी दिली जाणार आहे. नक्की वाचा: Indian Army Recruitment 2025: बारावी पास तरूण Technical Entry Scheme (TES-54) साठी करू शकता अर्ज; पहा पात्रता निकष, मानधन आणि अंतिम मुदत.
नवी मुंबई महानगरपालिकेतील या नोकरीसाठीच्या परीक्षा 30 वर्गातील 668 जागांसाठी होणार आहे. हॉल तिकीटावर परीक्षेची वेळ आणि ठिकाण याची माहिती दिली जाणार आहे त्यामुळे तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याच्या परीक्षेच्या आठवडाभर आधी हॉल तिकीट येणार असल्याने उमेदवारांना वेळोवेळी वेबसाईट पाहत राहणं आवश्यक असल्याची माहिती देण्यात आली आहे.