Nitin Gadkari (Photo Credit - ANI/Twitter)

महाराष्ट्र (Maharashtra) भाजपत (BJP) रोजचं महत्वाच्या मोठ्या घडामोडी बघायला मिळत आहेत. कालचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलारांना (Ashish Shelar) मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai City Chief) पदाची कमान सोपवण्यात आली आहे. आज चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागपूरात (Nagpur) सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Cm Devendra Fadnavis), प्रविण दरेकर (Pravin Darekar) अशा भाजपच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी हजेरी लावली होती. दरम्यान राज्यातील राजकारणासह भाजप पक्षाअंतर्गत बाबींवर नितीन गडकरी यांची जोरदार फटकेबाजी बघायला मिळाली.

 

चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे ऑटो चालणारा एक सामान्य भाजप कार्यकर्ता आपल्या कर्तुत्वामुळे पक्षाचा राज्याचा प्रदेशाध्यक्ष बनला आहे, असं वक्तव्य गडकरींनी केलं. तसेच देवेंद्र फडणवीस जर दिल्लीत गेले तर चंद्रशेखर बावनकुळेंना मुख्यमंत्री होण्याची संधी आहे", असं मोठं विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आपल्या पक्षात परिवार वाद आणि लॉबिंग (Lobbing) चालत नाही याचा संदेश याद्वारे सर्वांना मिळाला आहे. पक्षासाठी झटणाऱ्या प्रत्येकाकडे पक्षश्रेष्ठींचं लक्ष असते. त्यामुळे पुढे पुढे करणारे नेत्यांची दिशाभूल करु शकत नाही याची नोंद प्रामाणिक कार्यकर्त्याने घ्यावी, अस सुचक विधान नितीन गडकरींनी केलं आहे.(हे ही वाचा:- Deputy CM Devendra Fadnavis: तुम्ही पतंगबाजी करत राहा, आम्ही लवकरच खाते वाटप करु; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना खोचक टोला)

 

तसेच नवनिर्वाचित महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे बाबत नितीन गडकरी म्हणाले, एखाद्याकडून आपला काम कसा करवून घ्यायचा यामध्ये आमदार चंद्रशेखर बावनकुळे एक्स्पर्ट आहेत. कोणाचं पत्र, कोणाची फाईल आणि निधी कोणत्या गावात गेला हे फक्त त्यांनाच कळते. मात्र त्यांचा काम तोपर्यंत निघून जाते. बावनकुळे हे माणसाची बाई आणि बाईचा माणूस करु शकतात, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सुप्त गुणांचं कौतुक केल आहे.