Devendra Fadnavis (Photo Credit - Twitter)

सरकार स्थापन होवून तब्बल एक महिना उलटून गेल्यानंतर राज्याच्या मंत्री मंडळाचा (Maharashtra Cabinet Expansion) विस्तार झाला. आता मंत्रीमंडळाच्या खाते वाटपाचा मात्र अजूनही मुहूर्त लागेना. विरोधकांकडून यावर जोरदार टीका होताना दिसत आहे.एवढचं नाही तर संबंधित मंत्री मंडळ विस्तारावर पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी देखील आपली प्रतिक्रीया देत भाजपला घरचा अहेर दिला होता. 18 आमदारांचा शपथ विधी पार पडल्यानंतर आता कुणाला कुठलं खातं दिल्या जाणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं (Maharashtra) लक्ष लागलं आहे. तरी या संबंधीत कुठलीही अधिकृत घोषणा भाजप कडून करण्यात आली नाही पण आज पहिल्यांदाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियाना संबंधीत नागपूरात (Nagpur) आहेत. त्यांना खाते वाटपासंबंधी पत्रकारांनी प्रश्न विचारला असा फडणवीस म्हणाले, तुम्ही पतंगबाजी करत राहा आम्ही लवकरच खाते वाटप करु, असा खोचक टोला फडणवीसांनी विरोधकांना लगावला आहे. तर महाराष्ट्र  भाजपत रोजचं महत्वाच्या घडामोडी बघायला मिळतात. कालचं चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bavankule) महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलारांना (Ashish Shelar) मुंबई भाजप अध्यक्ष (Mumbai City Chief) पदाची कमान सोपवण्यात आली आहे. (हे ही वाचा:- Maharashtra Rains: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर विदर्भातही पावसाचा जोर कायम)

तरी खाते वाटपाच्या प्रश्नावरुन विरोधीपक्ष नेते अजित पवार, सुप्रिया सुळे, नाना पटोले यांसारख्या बड्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. तरी राज्यातील जनतेला देखील खाते वाटप कधी होणार असा प्रश्न पडला आहे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र या भागात महापूरा सारख्या गंभीर समस्या उद्भवत असताना कुठल्याही भागात पालकमंत्री नाही ही राज्यासाठी चिंता जनक बाब आहे.