Maharashtra Rains: कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार तर विदर्भातही पावसाचा जोर कायम
Rains | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

राज्यातील विविध भागात पाऊस मुसळधार पाऊस कोसळत आहे. गेल्या काही दिवसात भागात पूरसदृश्य (Flood) परिस्थिती निर्माण झाली असुन विविध गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला आहे. विदर्भातील (Vidarbha) विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असुन पुन्हा एकदा पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्यानं विळखा घातला असुन मोठ्या धरणांचे  दरवाजे उघडण्यात आले आहे. विदर्भातील भंडारा (Bhandara), गोंदिया (Gondia), नागपूर (Nagpur) या जिल्ह्यांना पावसानं झोडपून काढलं आहे. शहरी भागात पावसाचा जोर कमी असला तरी ग्रामीण भागात मात्र जोरदार पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे. तर मराठवाड्यासह (Marathwada) उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.

 

पश्चिम महाराष्ट्रासह (Western Maharashtra) कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील नद्या तुडूंब भरुन वाहत असुन अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तरी नद्याकाठील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सोबतच पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होणाऱ्या भागात एनडीआरएफच्या (NDRF) तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. या पावसामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं असुन काही ठिकाणी शेती पिकांना देखील या पावसाचा फटका बसला आहे. हवामान विभागाच्या (Weather Forcasting) अंदाजानुसार आज पश्चिम महाराष्ट्रासह कोकणात (Konkan) यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. (हे ही वाचा:- Mumbai-Pune Express Highway Traffic: मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर वाहतूककोंडी; वाहनांच्या 2 किमी लांब रांगा)

 

राज्यात अनेक ठिकाणी पावसानं धुमाकूळ घातला आहे. यामुळं काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: विदर्भासह कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. मुसळधार पावसामुळं धरणांच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. अनेक धरणांमधून नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग सुरु असून, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान, पुढील तीन दिवस राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात यलो अलर्ट देण्यात आला आहे.