चार वेळेस नॅशनल अवॉर्ड मिळवणारे, राजकीय पक्ष, सामाजिक संस्था ते बॉलिवूड, मराठी सिनेमा यांच्यासाठी दर्जेदार काम करणारे कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांचा अकाली मृत्यू सार्यांच्याच मनाला चटका लावून जाणारा आहे. मध्यमवर्गातून पुढे आलेले नितीन देसाई हे उमदे होते त्यांचा शेवट 'आत्महत्ये'ने होणं हे पटणारं नाही अशी प्रतिक्रिया त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेकांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे नितीन देसाई यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्याचे मोठे आव्हान पोलिस यंत्रणेसमोर आहे. आज Raigad SP Somnath Gharghe यांनी मीडीयाशी बोलताना दिलेल्या माहितीमध्ये नितीन देसाई यांच्या मृत्यूमागील कारण शोधण्यासाठी सार्या बाजूने तपास केला जाईल असं सांगण्यात आलं आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये नितीन देसाई मृतावस्थेत आढळले आहेत.
नितीन देसाई यांच्या आत्महत्येचं समजल्यानंतर पोलिसांनी एनडी स्टुडिओ सील केला आहे. गेटवर बंदोबस्त लावला आहे. आत काम करणार्यांनाच केवळ पोलिस परवानगी देत आहेत. दरम्यान फॉरेंसिक टीम, सायबर फ़ॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड यांचे पथक एनडी स्टुडिओ मध्ये बोलावण्यात आले आहे. नक्की वाचा: Nitin Desai Suicide: आर्थिक विवंचनेतून नितीन देसाई यांची आत्महत्या? स्थानिक आमदार MLA Mahesh Baldi यांनी पहा दिलेली प्रतिक्रिया (Watch Video) .
#WATCH | We found the body of art director Nitin Desai hanging by a rope in ND Studios in Karjat today. Investigation is being conducted from all angles: Raigad SP Somnath Gharghe#Maharashtra pic.twitter.com/r1pGjG6xOs
— ANI (@ANI) August 2, 2023
मीडीया रिपोर्ट्सनुसार, नितीन देसाई यांच्यावर कर्जाचा बोजा होता. त्यामध्ये त्यांच्या एनडी स्टुडिओ वर जप्ती देखील येणार होती. एडलवाईस असेट रीकन्स्ट्रक्शन कंपनीने एन.डी स्टुडिओ जप्त करण्यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी यांच्याकडे परवानगी मागितली होती. मात्र रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यावर कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती.
ABP च्या रिपोर्ट नुसार, नितीन देसाई काल रात्री दिल्ली वरून मुंबई ला आले होते. त्यांना काही व्यावसायिकांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यांनी रात्री काही ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या होत्या. मॅनेजरला त्यांनी कळवले होते सकाळी (2 ऑगस्टला) त्या देतो मात्र आज सकाळी त्यांनी एनडी स्टुडिओ मध्येच आत्महत्या करून आपण जीवन संपवलं आहे. या क्लिप्स मध्ये 4 जणांची नावं असल्याचा दावा आहे.