प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनाच्या वृत्ताने सार्‍या सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मध्यम वर्गातून आलेल्या आणि देशात-परदेशात नाव कमावलेल्या नितीन देसाईंनी आज आत्महत्या करत आपलं जीवन संपवलं आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओ मध्ये त्यांनी गळफास घेतला आहे. यावर बोलताना सथानिक आमदारांनी प्रथम दर्शनी त्यांची ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असल्याचा कयास बोलून दाखवला आहे. मागील वर्षभरात कोणता मोठा सिनेमा आला नाही. मालिकांवर सारं सुरू होतं. त्यामुळे आर्थिक गणित बिघडलं असल्याचं महेश बादली बोलले असल्याचं म्हणाले आहे. पहाटे 4 च्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)