Nilofer Malik Khan आणि Kranti Redkar मध्ये रंगलं ट्वीटरवॉर
Kranti Redkar | (Photo Credit: Facebook)

मागील काही दिवसांपासून एनसीपी नेते आणि मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) आणि एनसीबी मुंबई चे झोनल हेड समीर वानखेडे(Sameer Wankhede)  यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या आहेत. रोज नवनवे खुलासे होत असल्याने या प्रकरणाची चर्चा वाढत आहे. आता या दोघांसोबतच त्यांच्या परिवारातील लोकांमध्येही ट्वीटर वॉर सुरू झालं आहे. काल, शुक्रवार (19 नोव्हेंबर) दिवशी मंत्री नवाब मलिक यांनी आपण पत्रकार परिषद घेत असल्याचं ट्वीट केले. दरम्यान आता मलिकांच्या पत्रकार परिषदांचं नवल नाही कारण शाहरूख खानचा लेक आर्यन खानच्या अटकेनंतर ते वरचेवर पत्रकार परिषदा संबोधित करत आहेत.

दरम्यान समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) ने देखील ट्वीट केले. 'सकाळ झाली की समीर वानखेडे ... सुरू. नवाब मलिक उठता, बसता, झोपता केवळ समीर वानखेडेंचाच विचार करतात. दहशत निर्माण करावी तर अशी एका सच्च्या ऑफिसरची हीच भीती हवी.' अशा आशयाचं ट्वीट केले होते. नक्की वाचा: Sameer Wankhede Case: नवाब मलिक यांच्याविरुद्ध हर्षदा दीनानाथ रेडकर यांची तक्रार .

क्रांतीच्या ट्वीटवर नवाबांच्या मुलीने म्हणजेच निलोफर मलिक खान (Nilofer Malik Khan) ने उत्तर दिले. "जे गैरप्रकार करतात ते घाबरतात. सर्व गैरकृत्ये उघड होत आहेत या भीतीने थरथर कापणे थांबवा. यातून कोणताही हेतू साध्य होणार नाही."असे ट्वीट केले आहे. नक्की वाचा: Aryan Khan Drugs Case: 'तर मी मंत्रिपद सोडेन', आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात नवाब मलीक यांचे समीर वानखेडे कुटुंबीयांना खुले आव्हान .

नवाब मलिकांनी काल पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे 17 वर्षांचे होते जेव्हा त्यांच्या वडिलांनी बार लायसन्स समीरच्या नावावर घेतले असं म्हटलं आहे. हा बार अजूनही चालू आहे आणि समीर वानखेडेंनी ही माहिती लपवली असल्याचा मलिकांचा दावा आहे. समीर वानखेडेंनी हा दावा देखील खोडून काढत सारे इन्कम हे टॅक्स रिटर्न मध्ये दाखवले जाते असे म्हटलं आहे.

नवाब मलिकांनी यापूर्वीच समीर वानखेडे यांच्यावर खोट्या कागदपत्रांची, आरक्षणाचा गैरफायदा घेत सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे. आता त्यामध्ये अल्पवयीन असताना बार लायसन्स मिळवणे हे देखील बेकायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.