'येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संजय राऊतला धरून मजबूत चोपेल'- निलेश राणे
Nilesh Rane, Sanjay Raut (Photo Credits: Facebook, PTI)

सरकार स्थापनेच्या या रणधुमाळीत जवळपास सर्वच राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत.

प्रामुख्याने शिवसेना नेते संजय राऊत सध्या भलतेच चर्चेत आहेत. रोज पत्रकार परिषद घेऊन रोज भाजप पक्षावर आणि नेत्यांवर ते टीका करत असतात. आणि त्यामुळे भाजप नेते ही त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. अशा एकूण परिस्थितीत माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर जवळपास हल्लाबोल केला आहे.

निलेश राणे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत, "मला काल पासून वाटतंय येणाऱ्या काही दिवसांत शिवसैनिकच संज्या राऊतला धरून मजबूत चोपेल,” त्यांच्यावर टीका केली आहे.

इतकंच नव्हे तर एका ट्विटमधून त्यांनी लिहिलं होतं की, “संज्या राऊत इतका गरीब आहे की मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद बघायला पवार साहेबांच्या घरी गेला. बाकी राहुदे त्याला अगोदर कोणी तरी TV आणि लाईट बिलचे पैसे द्या. आणि उध्दव ला कॅटबरी चॉकलेट द्या बिचाऱ्याला वाईट वाटलं की त्याला खोटारडा म्हटलं. शाळेत असल्यासारखा वाटलं त्याला बघून.”

शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद न देणे भाजपचा अहंकार- संजय राऊत

८ नोव्हेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली असता ती शरद पवारांबरोबरच त्यांच्या निवासस्थानी पाहिल्याचे संजय राऊत यांनी त्याच दिवशी संध्याकाळी बोलून दाखवलं होतं.

शिवसेना पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी-काँग्रेस कडून समर्थन- संजय राऊत

दरम्यान शिवसेना पक्षाला सत्तास्थापन करण्यासाठी आज (नोव्हेंबर 11) संध्याकाळपर्यंतचा कालावधी राज्यपालांकडून देण्यात आला आहे.