संजय राऊत (Photo Credits: IANS)

भाजप-शिवसेना (BPJ-ShivSena) यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून अधिकच वाद पेटल्याच दिसत आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागून अनेक दिवस उलटले, तरीदेखील महाराष्ट्रात (Maharashtra) अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. दरम्यान, शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आक्रमक भुमिका घेऊन पुन्हा भाजपवर शाब्दिक हल्ला चढवला आहे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असा शिवसेना दावा करत आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता, असे भाजपने स्पष्ट केले आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, भाजप विरोधी बाकावर बसायला तयार आहे. मात्र, शिवसेना पक्षाला मुख्यमंत्रीपद द्यायला तयार नाही. हा भाजपचा अहंकार आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्तासंघर्ष वाढला आहे. मुख्यमंत्रीपदावरुन युतीत वाद सुरुच आहे. दरम्यान, भाजपने सत्ता स्थापन करणार नसल्याचे संकेत दिले आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी दर्शवत भाजपवर निशाणा साधला आहे. नुकतीच पार पडलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी सत्तेस्थापनेबाबत आपले मत मांडले आहे. 'भाजपा सत्ता स्थापन करू शकला नाही. याचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे आहे. युतीच्या फॉर्म्युल्यानुसार कार्यवाही झाली असती, तर भाजपावर विरोधी बाकावर बसण्याची वेळ आली नसती. प्रसंगी विरोधी बाकावर बसू पण, शिवसेनेला मुख्यमंत्री पद देणार नाही. या अंहकाराच्या भूमिकेतून भाजपावर ही वेळ आली आहे, असे राऊत म्हणाले आहेत. हे देखील वाचा- राज्यात नवी युती पाहायला मिळणार? शिवसेना युतीतून बाहेर पडण्याची शक्यता

महाराष्ट्राचे राजकारण पेट असून राज्यात सत्तास्थापनेबाबत आज मोठा निर्णय घेण्यात येईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप आपपल्या पक्षाची नेत्यांशी चर्चा करत आहेत. भाजप-शिवसेना यांची युती तुटून नवे सरकार स्थापन होईल, असा अंदाजही वर्तवला जात आहे. राज्यपालांकडून शिवसेनेला सत्ता स्थापन करण्याचे निमंत्रण मिळाले असून महाराष्ट्रात सत्ता कोणाची स्थापन होणार? आज या प्रश्नावर पूर्णविराम लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.