राज्यात नवी युती पाहायला मिळणार? शिवसेना युतीतून बाहेर पडण्याची शक्यता
Sonia Gandhi, Uddhav Thackeray And Sharad Pawar (Photo Credit: PTI)

महाराष्ट्र (Maharashtra) विधानसभा निवडणुकीत भाजप- शिवसेना (BJP-ShivSena) महायुतीने एकसोबत निवडणूक लढवली होती. परंतु विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर दोन्ही पक्षात मुख्यमंत्रीपदावरुन वाद निर्माण झाला. यामुळे राज्यात सत्तासंघर्ष वाढला आहे. भाजपने मुख्यमंत्रीपदाचा शब्द दिला होता, असा शिवसेना दावा करत आहे. तर मुख्यमंत्रीपदाच्याबाबत कोणताही निर्णय झाला नव्हता, असे भाजपने स्पष्ट केले. त्यानंतर भाजप- शिवसेनापक्षात दरी आणखी वाढली आहे. यातच शिवसेना पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congres-NCP) हात मिळवणी करणार, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी इतर राजकीय पक्षाकडून जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच राज्यात कोणत्या पक्षाच्या झेंडा फडकणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्यात आघाडी तर भाजप-शिवसेना युती झाली होती. पण आता चित्र वेगळेच पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने अधिक जागा मिळवल्या तरीदेखील राज्यात अजूनही सत्ता स्थापन झाली नाही. मुख्यमंत्रीपदावरुन दोन्ही पक्षात रस्सीखेच सुरु झाली आहे. यातच शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करणार असल्याचे चिन्हं दिसत आहे. याबाबत शिवसेनेने कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. मात्र, शिवसेना पक्षाकडून दिली जाणारी प्रतिक्रिया हेच दर्शवत आहे. त्याचबरोबर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसच्या आमदारांकडून पक्षाच्या नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. आता केवळ काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या होकाराची प्रतिक्षा आहे. यासाठी रविवारी काँग्रेस नेत्यांची जयपूर बैठकही पार पडली होती. हे देखील वाचा- शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा

भाजपने गेल्या विधानसभा निवडणुकीत बहुमताचा आकडा पार करत सत्ता स्थापन केली होती. परंतु, या निवडणुकीत भाजपने अधिक जागा मिळवल्या असल्यातरी राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना पक्षाची गरज भासत आहे. यामुळे शिवसेनाही त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचे दिसत आहे.