शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Archived images)

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे(Nilesh Rane)यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray)यांच्यावर आरोप्रत्यारोप करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी निलेश राणे यांनी आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या मृत्यूस बाळासाहेब जबाबदार आहेत असे म्हटले आहेत. त्याचसोबत गायक सोनू निगमला (Sonu Nigam) सुद्धा या प्रकरणी खेचत त्याचा ठाकरे घराण्याशी काय संबंध असे ही म्हटले होते. मात्र पुन्हा एकदा निलेश राणे यांनी शिवसेनेला धारेवर धरत वादग्रस्त विधान केले आहे.

निलेश राणे यांनी पुन्हा ठाकरे घराण्यावर टीका करत मातोश्री(Matoshree)बंगल्यात कोणत्या मजल्यावर कायं कायं चालायचे असे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्याचसोबत ठाकरे कसे आहेत हे कळल्यावर लोक अंगावरील कपडे काढून टाकतील असे ही म्हटले आहे. त्याचसोबत आमच्या नादाला लागू नका, नाहीतर ठाकरे यांची अब्रुचे रस्त्यावर धिंडवडे काढण्यास मागे पुढे पाहणार नाही अशा भाषेत निलेश राणे यांनी टीका केली आहे. (हेही वाचा-आनंद दिघे यांना कोणी मारलं? सोनू निगमच्या हत्येचा कट कोणी रचला? निलेश राणे यांच्याकडून बाळासाहेब ठाकरे यांच्यावर खळबळजनक आरोप)

शिवसेना पक्ष या वक्तव्यामुळे संताप व्यक्त करतील. परंतु असे कोणतेच चित्र दिसत नसल्याचे राणे यांनी म्हटले. त्याचसोबत शिसैनिकांनाही ठाकरे यांच्याबद्दल खरं माहिती असून ही अबोल आहेत. मात्र निलेश राणे यांनी केलेल्या या वादग्रस्त विधानामुळे दोघांत फाईट वातावरण झाल असल्याचे राणे यांनी उघडपणे सांगितले आहे.