Fake Currency Case: राष्ट्रीय तपास संस्थेने (National Investigation Agency, NIA) बनावट भारतीय चलनी नोटा (FICN) प्रकरणी मुंबईत मोठी कारवाई केली आहे. एनआयएने 2021 च्या बनावट चलन प्रकरणात (Fake Currency Case) सहा ठिकाणी छापे टाकले असून एफसीएन रॅकेटमध्ये ( FCN Racket) डी कंपनीच्या सहभागाची पुष्टी करणारी गुन्हेगारी सामग्री जप्त केली आहे.
यात धारदार शस्त्रे, डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे यांचा समावेश आहे, जे बनावट चलनाच्या रॅकेटमध्ये डी-कंपनीशी थेट संबंध प्रस्थापित करणाऱ्या NIA च्या पूर्वीच्या तपासातील निष्कर्षांचे पुरावे आहेत. (हेही वाचा - Uddhav Thackeray On SC Decision: 'सत्तेसाठी हपापलेल्या राजकारण्यांची चिरफाड करणारा निर्णय' - उद्धव ठाकरे यांनी दिली सत्तासंघर्ष प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया)
या प्रकरणातील NIA तपासादरम्यान D-कंपनीची भूमिका भारतातील FICN च्या प्रसारामध्ये प्रथमदर्शनी प्रस्थापित करण्यात आली आहे. 18 नोव्हेंबर 2021 रोजी नौपाडा पोलिस स्टेशन, ठाणे शहर येथे आयपीसी आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा, 1967 च्या संबंधित कलमांतर्गत नोंद झालेल्या या प्रकरणात दोन जणांना अटक करण्यात आली. रियाझ आणि नसीर अशी आरोपींची ओळख पटली होती. हे दोघेही मुंबईचे रहिवासी असून ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
Fake currency seizure case involving D-Company: NIA raids 6 places in Mumbai
Read @ANI Story | https://t.co/Kw59MPJh4I#NIA #Mumbai pic.twitter.com/FK5RFeB4Yh
— ANI Digital (@ani_digital) May 11, 2023
ठाणे पोलिसांनी या हाय-प्रोफाइल प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला होता. बुधवारी, एनआयएने या प्रकरणातील तपासाचा भाग म्हणून आरोपी आणि संशयितांच्या अनेक मालमत्तांवर छापे टाकले. यात बहुतेक घरे तसेच कार्यालयांचा समावेश होता.