NIA, ED Raid PFI Offices: एनआयए, ईडीचे पीएआय कार्यालये आणि संबंधित ठिकाणांवर छापे; 100 पेक्षा अधिक जणांना अटक झाल्याचे वृत्त
National Investigation Agency | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) 10 राज्यांमध्ये दहशतवादाचे समर्थन केल्याबद्दल अनेक संशयास्पद गट, प्रामुख्याने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यकर्त्यांविरुद्ध शोध मोहीम सुरू केली आहे. दहशतवादी प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात, तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात आणि इतर दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरवण्यात सहभागी असल्याचा संशय असलेल्यांच्या ठिकाणांवर छापे (NIA, ED Raid PFI Offices) टाकले जात आहेत. एनआयएची आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई म्हणून ओळखली जात आहे. या कारवाईत 100 जणांन आतापर्यंत अटक झाल्याचे समजते. हा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एएनआने इतरही काही केंद्रीय तपास यंणांच्या सहाय्याने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. यात ईडीचा समावेश आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या सहाय्याने एएनआयने पीएफआयच्या राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक नेतृत्वाच्या घरांवर छापे टाकले आहेत असे, अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. छाप्यांवर प्रतिक्रिया देताना, पीएफआयने सांगितले की "फॅसिस्ट राजवटीने" त्याच्या विरोधात असहमत असलेल्यांना शांत करण्यासाठी एजन्सींचा वापर केला होता. आजही तेच सुरु आहे. (हेही वाचा, एनआयएने जाहीर केले Dawood Ibrahim वर 25 लाख, तर त्याचा साथीदार Chhota Shakeel वर 20 लाखांचे रोख बक्षीस)

10 राज्यांमध्ये कारवाई, 100 जणांना अटक

एएनआयने आतापर्यंत 10 राज्यांमध्ये कावाई केली आहे. यात महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, असम, दिल्ली, मध्य प्रदेश, पुद्दुचेरी, तामिनळाडू, उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे.

कोणत्या राज्यात कितीजणांना अटक?

  • केरळ- 22 जणांना अटक
  • महाराष्ट्र- 20 जणांना अटक
  • कर्नाटक- 20 जणांना अटक
  • आध्रप्रदे- 5 जणांना अटक
  • असम- 9 जणांना अटक
  • दिल्ली- 3 जणांना अटक
  • मध्य प्रदेश- 4 जणांना अटक
  • पुद्दुचेरी- 3 जणांना अटक
  • तामिळनाडू- 10 जणांना अटक
  • उत्तर प्रदेश- 8 जणांना अटक
  • राजस्थान- 2 जणांना अटक

देशातील नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा विरोधी आंदोलन, 2020 दिल्ली दंगल, हातरस (उत्तर प्रदेशातील एक जिल्हा) येथे कथित सामूहिक बलात्काराच्या आरोपांवरून ED PFI च्या कथित "आर्थिक संबंधांची" चौकशी करत आहे.

ट्विट

केरळमध्ये 2006 मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाची स्थापना झाली आणि त्याचे मुख्यालय दिल्लीत आहे. लखनौ येथील विशेष पीएमएलए कोर्टात तपास संस्थेने पीएफआय आणि त्याच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध दोन आरोपपत्रे दाखल केली आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये, ईडीने पीएफआय आणि त्याची विद्यार्थी-विंग कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया (सीएफआय) विरुद्ध मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली पहिले आरोपपत्र दाखल केले होते, आणि दावा केला होता की त्याचे सदस्य हातरसच्या नंतर जातीय दंगली भडकवू आणि दहशत पसरवू इच्छित होते.