एनआयएने जाहीर केले Dawood Ibrahim वर 25 लाख, तर त्याचा साथीदार Chhota Shakeel वर 20 लाखांचे रोख बक्षीस

तपास एजन्सीने इब्राहिमचा जवळचा सहकारी शकील शेख उर्फ ​​छोटा शकीलवर 20 लाख रुपये आणि हाजी अनीस उर्फ ​​अनीस इब्राहिम शेख, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ ​​टायगरवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

बातम्या टीम लेटेस्टली|
एनआयएने जाहीर केले Dawood Ibrahim वर 25 लाख, तर त्याचा साथीदार Chhota Shakeel वर 20 लाखांचे रोख बक्षीस
Dawood Ibrahim (PC -Facebook)

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या 'डी' कंपनीच्या टोळीतील संबंधांची माहिती देणाऱ्याला रोख बक्षीस जाहीर केले आहे. अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर एनआयएने 25 लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. एनआयएच्या म्हणण्यानुसार दाऊद इब्राहिमची टोळी भारतात शस्त्रे, स्फोटके, ड्रग्ज आणि बनावट भारतीय चलनी नोटांची तस्करी करण्यासाठी आणि दहशतवादी हल्ले करण्यासाठी पाकिस्तानी एजन्सी आणि दहशतवादी संघटनांशी हातमिळवणी करून एक युनिट स्थापन करण्याचा प्रयत्न करत आहे.

तपास एजन्सीने इब्राहिमचा जवळचा सहकारी शकील शेख उर्फ ​​छोटा शकीलवर 20 लाख रुपये आणि हाजी अनीस उर्फ ​​अनीस इब्राहिम शेख, जावेद पटेल उर्फ ​​जावेद चिकना आणि इब्राहिम मुश्ताक अब्दुल रज्जाक मेमन उर्फ ​​टायगरवर प्रत्येकी 15 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हे सर्वजण 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी आहेत.

अधिकाऱ्याने सांगितले की, एनआयएने त्यांच्याबद्दल माहिती मागवली आहे ज्यामुळे त्यांना अटक होऊ शकते. एजन्सीने फेब्रुवारीमध्ये 'डी कंपनी'विरोधात गुन्हा दाखल केला होता. एनआयएने एका निवेदनात म्हटले आहे की, अनीस इब्राहिम शेख, छोटा शकील, जावेद चिखना आणि टायगर मेमन यांचा समावेश असलेल्या डी-कंपनी नावाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी नेटवर्क चालवणाऱ्या दाऊद इब्राहिमला संयुक्त राष्ट्राने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. (हेही वाचा: Crime: आधी 10 वर्षाच्या मुलाचे केले अपहरण, नंतर घरच्यांकडे 6 लाख देण्याचा लावला तगादा, पैसे न मिळाल्याने चिमुकल्याची हत्या)

या वर्षी मे महिन्यात एनआयएने दाऊदच्या विरोधात 29 ठिकाणी छापे टाकले होते. पाकिस्तानच्या कराचीमध्ये लपलेला दाऊद हा भारताचा मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटासह अनेक प्रकरणांमध्ये भारत दाऊदचा शोध घेत आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने यापूर्वीच दाऊदवर 2003 मध्ये 25 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर केले आहे. दाऊदशिवाय भारताच्या मोस्ट वॉन्टेड यादीत लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिद्दीनचा संस्थापक सईद सलाहुद्दीन आणि त्याचा खास अब्दुल रौफ असगर यांचा समावेश आहे.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change