Pradeep Sharma File Photo (Photo Credits: Facebook)

Mumbai Police दलातील  Former 'Encounter Specialist' अशी ओळख असलेले आणि शिवसेना नेते Pradeep Sharma यांना NIA कडून  आज (17 जून) अखेर अटक करण्यात आली आहे. आज सकाळीच एनआयए प्रदीप शर्माच्या अंधेरी येथील  घरी पोहचली होती. त्यावेळी छापेमारीचं कारण सांगण्यात आले होते पण छापेमारी आणि चौकशी नंतर अखेर प्रदीप शर्माला एनआयए ने अटकेची कारवाई केली आहे. ही अटक मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामध्ये झाली आहे. दरम्यान मुंबई पोलिस दलातील सचिन वाझे नंतर प्रदीप शर्मा यांची  मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणामध्ये दुसरी मोठी अटक आहे. आज थोड्याच वेळात त्यांना कोर्टात दाखल करून एनआयए कस्टडीची मागणी होऊ शकते. Antilia Explosives Case: एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांच्या घरावर NIA चा छापा; मोठ्या प्रमाणावर CRPF तैनात.

ANI Tweet

मनसुख हिरेन आणि अ‍ॅन्टिलिया जवळील स्फोटकं प्रकरणी प्रदीप शर्मा यांची चौकशी झाली होती. त्यामुळे एनआयएच्या ते कायम रडारवर होते. सध्या अ‍ॅन्टिलिया आणि मनसुख हिरेन प्रकरणामध्ये सचिन वाझे यांच्या अटकेनंतर एपीआय रियाज काझी, सुनिल माने, हवालदार विनायक शिंदे, बुकी नरेश गोर, संतोष शैलार, आनंद जाधव यांना देखील अटक केली आहे. हे सारे मुंबई पोलिस खात्या तील कर्मचारी आहेत.

113 गँगस्टरचं एन्काऊटंर प्रदीप शर्मा यांच्या नावे आहेत. लखन भैया बनावट एन्काऊटर, दाऊदचा भाऊ इकबाल कासकरची अटक मध्ये प्रदीप शर्मा यांचं नाव जोडलेले आहे. दरम्यान प्रदीप शर्मांनी 2019 मध्ये शिवसेनेच्या तिकीटावर नालासोपारा विधानसभा निवडणूक लढवली होती पण ते जिंकू शकले नाहीत.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर जिलेटिनच्या कांड्या असलेली स्कॉर्पिओ ठेवल्याप्रकरणी आणि याच प्रकरणात व्यवसायिक मनसूख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू या दोघांचं गूढ उकलण्यासाठी सध्या केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात काम करत आहेत.