मुंबईतील घरांबाबतीत आणखी महत्वाची माहिती समोर आली आहे. मागील वर्षात मुंबई महानगर क्षेत्रातील घरांची विक्री 5 टक्क्यांनी घसरल्याचा अहवाल समोर आला आहे. नाईट फ्रँक इंडियाने आपल्या सहामाही अहवालात ही माहिती जाहीर केली आहे. मुंबईचे (Mumbai) राहणीमान बदलत चालले असून मुंबईचा कायापालट होत आहे. यात मोठमोठ्या टोलेजंग इमारतींनी संपूर्ण मुंबईचा चेहरामोहराच बदलून टाकला आहे. मात्र या मोठमोठाल्या इमारतींमुळे घराच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत. त्याच 2016 मध्ये झालेल्या नोटबंदीच्या निर्णयाचा मुंबईतील घरविक्रीवर परिणाम झाला. मुंबईतील घरांच्या विक्रीत 5 टक्क्यांची घट झाल्याचे निदर्शनास आले आहे.
मुंबईत स्वत:चे हक्काचे घर असावे असं स्वप्न अनेकांचे असते. मात्र सध्या मुंबईत येणा-या टोलेजंग इमारतीमुळे त्यांच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे सामान्यांसाठी मुंबईत घर घेणे म्हणावे तितके सोपे राहिलेले नाही. म्हणूनच नवीन घरं घेण्याचा विचार सध्या मुंबईकर करत नाही. त्याचाच परिणाम की काय 2019 मधील मुंबईतील घरांच्या विक्रीत घट झाली आहे.
हेदेखील वाचा- नवीन घर किंवा फ्लॅट खरेदी करताना या गोष्टी नक्की तपासा
मुंबईत 2019 सालच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये 60 हजार 943 घरांची विक्री झाल्याची आकडेवारी आहे. तर वर्षांच्या दुसर्या सहामाहित 27 हजार 212 घरांची विक्री झाली. मुंबईत परवडणार्या घरांची संकल्पनाच संपूर्ण वर्षात राबविण्यात आली. मुंबईत नवीन घरांच्या प्रकल्पात 61 टक्के घरे ही सरासरी 75 लाख इतक्या किंमतीने विक्री करण्यात आली.
देशभरात आर्थिक मंदीचे वातावरण, लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका आणि बँकांसमोर असलेले संकट या सर्व गोष्टींचा फटका हा रिअल इस्टेट क्षेत्रालाही बसला आहे. विकासकांकडून अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात आलेल्या असतानाही घरांच्या विक्रीत घट पहायला मिळाली आहे.