Arrest | Representational Image | Photo Credits: File Photo

नेरळ पोलिसांनी (Neral police) एका 42 वर्षीय व्यक्तीला आरोग्य सेवा कर्मचार्‍यांशी (Healthcare workers) गैरवर्तन केल्या प्रकरणी आणि कोविड 19 अँटीजेन चाचणी (Corona Test) घेण्यास नकार दिल्याने अटक (Arrest) केली आहे. तसेच त्यांच्या कामात अडथळा आणला आहे. रविवारी दुपारी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर नेरुळमधील सेक्टर 15 मधील एन 2 इमारतीला डॉक्टर आणि नर्सचा समावेश असलेल्या टीमने भेट दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्याम शिंदे यांनी सांगितले की, नवी मुंबई नागरी आयुक्तांच्या आदेशानुसार, प्रत्येक पॉझिटिव्ह केससाठी अधिकाऱ्यांनी 31 व्यक्तींना संपर्क साधणे अपेक्षित आहे.

अधिका-यांनी आरोपी विपिनकुमार पूरनचंद भोला या दूरसंचार कंपनीचे प्रशिक्षक याच्याशी संपर्क साधला असता, त्याने त्यांचा नमुना घेऊ न देऊन त्यांच्या कामात अडथळा आणला आणि शिवीगाळ केली. आरोपींनी डॉक्टर आणि नर्सलाही ढकलून दिल्याचे शिंदे यांनी सांगितले. डॉक्टर रोहित खाटेक यांनी नेरुळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर भोलाला अटक करण्यात आली. हेही वाचा 'त्या' चॅटच्या स्क्रीनशॉटबाबत Kranti Redkar ने दाखल केली तक्रार; युजरने दिले स्पष्टीकरण- 'हा एक विनोदाचा भाग होता'

सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद फडतरे यांनी सांगितले की, भोलाला अटक केल्यानंतर त्याची आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली आणि ती निगेटिव्ह आली. त्याला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

कलम 353 लोकसेवकाला त्याच्या कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी प्राणघातक हल्ला किंवा गुन्हेगारी बळ, 188 लोकसेवकाने दिलेल्या आदेशाची अवज्ञा आणि 270 जीवासाठी धोकादायक रोगाचा संसर्ग पसरण्याची शक्यता या कलमांखाली आरोपीला अटक करण्यात आली आहे.