'ग्रहणा'वरून राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला; केलं हे ट्वीट!
Dhananjay Munde | (Photo Credit-Facebook)

सध्या भारत देशामध्ये CAA वरून वातावरण तापलं आहे.सोबत आर्थिक संकट, माहिला सुरक्षा यासारखे प्रश्न असताना दिल्लीमधून उगम पावलेले 'हे' ग्रहण कधी सुटणार असा सवाल विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. यासोबतच नरेंद्र मोदी यांचा सूर्यग्रहण पाहतानाचा एक फोटो शेअर केला आहे. आज नरेंद्र मोदी कंकणाकृती सूर्यग्रहणाचं विलोभानीय दृश्य पाहण्यासाठी कोझीकोड येथे पोहचले होते. तेथून त्यांनी काही खास फोटो शेअर केले होते. Surya Grahan 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोझीकोड येथून आपल्या खास अंदाजात पाहिले कंकणाकृती सूर्य ग्रहण, पाहा फोटो.

भारतीयांप्रमाणेच आपणही आजचं कंकणाकृती सूर्यग्रहण बघण्यासाठी उत्सुक होतो, पण दुर्दैवानं बघता आले नाही असं ट्वीट करून सांगितलं. सोबत काही फोटो शेअर केले आहेत. दरम्यान यावेळी मोदींनी शेअर केलेला फोटो धनंजय मुंडे यांनी शेअर करत दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल केला आहे.

धनंजय मुंडे यांचं ट्वीट 

सध्या नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातून भाजपावरही नागरिकत्त्व कायद्यावरून टीका होत आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांनी रस्त्यावर उतरून नागरिकत्त्व कायद्याविरुद्ध आवाज उठवला आहे.