एनसीपी नेते शरद पवार (Sharad Pawar) आज दुपारी 2 च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. ही भेट 'वर्षा' (Varsha) या मुख्यमंत्री निवासस्थानी होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. सध्या या आरक्षणावरून राज्यात वातावरण तापलेलं आहे. सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर सुवर्णमध्य काढत आरक्षणाचा मुद्दा निकाली लावण्यासाठी ही भेट घेतली जात असल्याची चर्चा आहे. दरम्यान या भेटीत आरक्षणासोबतच अन्य अनेक मुद्यांवर देखील चर्चा होऊ शकते. शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामधील ही आठवडाभरातील दुसरी भेट आहे. यापूर्वीची भेट 22 जुलैला झाली होती.
शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्या मागील भेटीत मराठा, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुढे आला होता. यावेळी दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देण्यावरही चर्चा झाली होती. आज खासदार शरद पवार मुख्यमंत्र्यांसोबत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा करण्याची शक्यता आहे.
NCP-SCP chief Sharad Pawar to meet Maharashtra CM Eknath Shidne to discuss the issue of Maratha Reservation. The meeting is to happen later today at Varsha Bungalow in Mumbai: CMO
— ANI (@ANI) August 3, 2024
राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
आज सकाळी राज ठाकरे यांचे शिष्टमंडळ देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला पोहचले होते. या शिष्टमंडळात राज ठाकरे यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकाऱ्यांचा समावेश होता.