Nawab Malik | ( Photo Credits: ANI))

महाराष्ट्राचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थांच्या (Drugs) तस्करीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.  यावेळी नवाब मलिकांनी ड्रग्जच्या तस्करीचा संबंध गुजरातशी (Gujrat) जोडला आहे. मलिक यांनी सोमवारी एक ट्विट (Tweet) शेअर केले. ट्विटमध्ये गुजरात एटीएसने 120 किलो ड्रग्ज ताब्यात घेतल्याची माहिती दिली आहे. ट्विट शेअर करताना मलिकांनी लिहिले की, पुन्हा गुजरात कनेक्शन. उडता गुजरात. तसेच मलिक यांनी एका टीव्ही पत्रकाराचे ट्विट शेअर केले आहे. हेही वाचा Gujarat Drug Case: गुजरातमध्ये 600 कोटी रुपयांचा अंमली पदार्थ जप्त

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, एटीएसने सुमारे 120 किलो ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. ज्याचे बाजारमूल्य अंदाजे 600 कोटी रुपये आहे.

याशिवाय हे ड्रग्ज पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. एटीएसने माल्या मियाना येथून अमली पदार्थ पकडले आहेत. याप्रकरणी 4 जणांना अंमली पदार्थांसह पकडण्यात आले आहे. डीजीपी आशिष भाटिया यांनी सांगितले की, एटीएसने 600 कोटी रुपयांच्या 120 किलो हेरॉईनसह तिघांना पकडले आहे.  आरोपींनी हेरॉईनची खेप सागरी मार्गाने आणल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून, ते पाकिस्तानी बोटीतून त्यांची डिलिव्हरी होते.