Jitendra Awhad (PC- Twitter)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (NCP Leader Jitendra Avhad) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाण्यातील एका तरुणाने जितेंद्र आव्हाड यांच्या 15 ते 20 समर्थकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. हा तरुण व्यवसायाने अभियंता आहे. या तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. त्यामुळे या तरुणाला मारहाण करण्यात आली.

या सर्व प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यावर सोशल मीडियावर अर्वाच्च्य भाषेत टीका होत आहे. 'जितेंद्र आव्हाड तुमचा दाभोळकर होणार', असा इशारा एका तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिला आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. एखाद्या व्यक्तीला मंत्र्यांच्या सुरक्षारक्षकाने मंत्र्यांच्या घरी नेऊन आणि मंत्र्यांच्याचं उपस्थितीत बेदम मारहाम करणे अतिशय गंभीर बाब असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटंल आहे. (हेही वाचा  - जितेंद्र आव्हाड यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला मारहाण; वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं. सामान्य माणसांवर अन्याय झाला, तर त्याविरुद्ध आवाज उठवणं चुक नाही. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. शासनकर्तेचं मारहाण करत असतील, तर कायद्याचे राज्य अस्तित्वात राहणार नाही, असं मतही देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं आहे.