आनंदराव पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला Represenational Image(File Photo)

सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील खटाव येथे सामाजिक कार्यकर्ते आनंदराव पाटील (Anandrao Patil) यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी केलेल्या जीवघेणा हल्ल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. काही तासांपूर्वी आनंंदराव पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. हा हल्ला करून हल्लेखोर मोटरसायकलवर पसार झाले होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने जोरदार हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांची मृत्यूशी झुंज अपशी ठरली आहे. आनंदराव पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे ते बंधू आहेत. या हल्ल्यानेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. (हेही वाचा - भाजप आमदार प्रशांत बंब यांनी स्वपक्षाचे खासदार प्रताप चिखलीकर यांना पाठवली 23 कोटींची मानहानीची नोटीस)

आनंदराव पाटील हे खटाव -भिलवडी रस्त्यावर असलेल्या आपल्या शेतातून परतत असताना त्यांच्यावर दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर आरोपी मोटरसायकलवरून पळून गेले. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. अद्याप हल्ल्याचं नेमकं कारण काय ते कळू शकलेलं नाही.