'अजित पवार मुर्दाबाद...!' अशा घोषणा देत राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक

राष्ट्रवादीचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आणि शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भुमिका घेतली आहे. लवकरच शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्यांची मुंबई येथील व्हाय. बी चव्हान या सभागृहात पत्रकार परिषद पार पडणार आहे. दरम्यान, सभागृहात राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून शरद पवार जिंदाबाद तर, अजित पवार मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा दिल्या जात आहेत. तसेच अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेना- काँग्रेस यांच्या होणाऱ्या बैठकीत काय निर्णय घेण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महत्वाचे म्हणजे, अजित पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात यावी अशी कार्यकर्त्यांकडून मागणी केली जात आहे.

एएनआयचे ट्वीट-