प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य - फेसबुक)

सुशांत सिंह राजपूत च्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेट (Bollywood Drugs Racket) समोर आले. यात अनेक कलाकारांची NCB कडून चौकशीही करण्यात आली. मात्र आता या ड्रग्ज प्रकरणात टॉलिवूडमधील अभिनेत्रीचेही नाव समोर आले आहे. मुंबईच्या NCB विभागाने शनिवारी रात्री मिरारोडच्या एका हॉटेलमध्ये छापा टाकला. या छाप्यात ड्रग्जचा पुरवठा करणारा चांद मोहम्मद याला रंगेहात पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून 400 ग्रॅम MD जप्त करण्यात आला असून याची किंमत 8 ते 10 लाखांपर्यंत आहे. तसेच यात हॉटेलमध्ये एका टॉलिवूड अभिनेत्रीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.

या धाडीत चांद मोहम्मद याला अटक झाली असली तरीह याचा मुख्य सूत्रधार सईद फरार आहे. पोलिस याचा शोध घेत असून अटक करण्यात आलेल्या चांदची अधिक चौकशी करत आहे. दरम्यान यात टॉलिवूडच्या अभिनेत्रीला अटक केली असून NCB अधिक तपास करत आहे.हेदेखील वाचा- Drugs Case: ड्रग्ज प्रकरणी 58 कोटी रुपयांचे Mephedrone जप्त, महाराष्ट्रातील ATS कडून 13 जणांना अटक

नववर्षाच्या पूर्वसंध्येपासून सुरु केलेल्या या धडक मोहिमेत NCB बराच ड्रग्जसाठा जप्त केला आहे.दरम्यान एनसीबीच्या मुंबई पथकाने नवीन वर्षाच्या संध्याकाळपासून शहरातील अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात त्यांना आतापर्यंत 4 ड्रग्ज विक्रेत्यांकडून 100 ग्रॅम मेफेड्रोन, 1.034 किलो सायकोट्रॉपिक औषधे हस्तगत केली. ही माहिती NCB चे झोनल संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी दिली आहे.

तसेच NCB ची धाड मोहिम अद्याप सुरु असून मुंबईत अमली पदार्थांची विक्री होऊ नये हा एकच उद्देश्य NCB समोर आले. त्या दिशेने तपास सुरु असून संशयित ठिकाणी छापे मारण्याची NCB ची मोहिम सुरु आहे. मागील महिन्यात मुंबईच्या गोवंडी भागातील शिवाजी नगर परिसरात 33 लाख किंमतीचे ड्रग्ज पिल्स (Durgs Pills) पोलिसांनी जप्त केले आहे. अँटी नारकोटिक सेल च्या पथकाने ही कारवाई केली आहे. ANI ने दिलेल्या माहितीनुसार, यात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.