Arrested

बॉलिवूड मधील ड्रग्ज प्रकरण बाहेर आल्यानंतर एनसीबीकडून सातत्याने तपास केला जात आहे. तसेच आता पर्यंत ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड मधील काही दिग्गज कलाकारांची सुद्धा नावे समोर आल्याचे दिसून आले आहे. तर नुकत्याच दोन दिवसांपूर्वी ही छत्रपती शिवाजी महाराज आंतराराष्ट्रीय विमानतळावर एका गिनी नागरिकाकडून ड्रग्ज तस्करी करताना अटक करण्यात आली आहे. याच पार्श्वभुमीवर आता ड्रग्ज प्रकरणी आता पर्यंत एकूण 146.143 किलोचे Mephedrone जप्त केले आहे.(धक्कादायक! शिर्डीत तब्बल 88 लोक अचानक गायब, महिलांचा जास्त समावेश; मानवी तस्करीची शंका व्यक्त करत कोर्टाने दिले चौकशीचे आदेश)

SAFEMA अथॉरिटी यांनी MD ड्रग्ज जप्त केले असून त्याची किंमत 58 कोटी रुपये आहे. या प्रकरणी महाराष्ट्र एटीएस पथकाकडून 13 जणांचा अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.(Human Trafficking: मंदिर असलेल्या शहरांमध्ये मानवी तस्करी? मुंबई उच्च न्यायलयाचे महाराष्ट्र पोलिसांना तपासाचे आदेश)

तर छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन 34 वर्षीय गिनी  नागरिकाकडून 2.935 किलोच्या कोकेनची तस्करी केली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. या जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत तब्बल 18 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले होते. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी येत्या 8 डिसेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. तर आरोपीच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या ट्रॉलीमध्ये लपवण्यात आलेल्या 2.9 किलोग्रॅमचे कोकने आढळले होते.