
मीरा भाईंदर वसई विरार (MBVV) गुन्हे शाखेने मीरा रोड (Miraroad) येथील भाड्याच्या खोलीतून चालवल्या जाणार्या बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंजचा (Illegal telephone exchange) पर्दाफाश केला आहे. जेथे आरोपींनी त्यांच्या परदेशी ग्राहकांना अत्यंत स्वस्त दरात फोन कॉल करण्याची सुविधा दिली होती. ज्यामुळे भारत संचारचे नुकसान झाले. पोलिसांनी सांगितले की, अशा सेवेचा वापर दहशतवादी, गुंड आणि गुन्हेगारांनी यापूर्वी केला आहे आणि या प्रकरणात या सेवेचा वापर कोणी केला याचा शोध घेत आहेत. गुजरात दहशतवादविरोधी पथकाला (ATS) मिळालेल्या माहितीवरून, गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या अधिकाऱ्यांनी सज्जाद सय्यद याला अटक केली आहे. सय्यद हा व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असून तो गुजरातचा रहिवासी आहे.
मीरा रोड येथील पूजा नगर येथील इमारतीत तो भाड्याने राहत होता आणि तेथून अवैध टेलिफोन एक्सचेंज चालवत होता. या सेवेचा वापर परदेशात राहणारे भारतीय, मुख्यतः आखाती देशांमध्ये, भारतात स्वस्त फोन कॉल करण्यासाठी करत होते. आरोपी ग्राहकांना 3 रुपये प्रति मिनिट दराने फोन कॉल करू देत होते. जेव्हा बीएसएनएल त्यासाठी सुमारे 16 रुपये आकारते. या बेकायदेशीर सेवेमुळे सरकारचा महसूल बुडत होता, असे एका अधिकाऱ्याने सांगितले
गुन्हे शाखेचे निरीक्षक अविराज कुराडे यांनी सांगितले की, गेल्या तीन महिन्यांपासून हे अवैध टेलिफोन एक्सचेंज सुरू होते. गुजरात एटीएसने अहमदाबाद येथून आणखी एका व्यक्तीला अटक केली आणि MBVV पोलिसांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातून अशीच सेवा चालवली जात असल्याची माहिती दिली. हेही वाचा Aryan Khan Bail: मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला जामीन मिळाला असला तरी 'या' नियमांचे करावे लागणार पालन
पोलिसांनी प्रत्येक बॉक्समध्ये 32 सिम कार्ड स्लॉटसह 3 सिम बॉक्स, 125 सिम कार्ड, सिम बॉक्ससाठी अँटेना, एक राउटर, एक लॅपटॉप, एक लॅन पोर्ट स्विच, एक लॅन केबल असा एकूण 3.42 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीला न्यायदंडाधिकारी न्यायालयात हजर केले असता त्याला 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.