Representative Image (Photo Credit: Facebook)

नवी मुंबईत (Navi Mumbai)  3 आणि 4 ऑक्टोंबरला पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची सूचना महापालिकेकडून देण्यात आली आहे. या शहाराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनी आणि भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यामुळेच नवी मुंबईतील नागरिकांना पुढील दोन दिवस पाणी बंद राहणार असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उद्या बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैराणे, घणसोली आणि ऐरोली या भागात पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. याचा फटका सिडको आणि कामोठे येथील नागरिकांना सुद्धा होणार आहे. तर मोरबे धरणातून शहराला दररोज 40 दक्षलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. या धरणामधील पाणी मुख्य जलवाहिनीच्या माध्यमातून भोकरपाडा जलशुद्धीकर येथे आणून त्यावर प्रक्रिया केल्यानंतर शहराला त्या पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. पण गेल्या काही दिवसांपासून या केंद्रात बिघाड होत असल्याने याच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.(मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव देखील भरलं; एकूण पाणीसाठा 85.68 %)

मुख्य जलवाहिनीचे काम करण्यासाठी पाच-सहा तासांचा अवधी लागणार आहे. तर शुक्रवारी म्हणजेच 4 ऑक्टोंबरला काही वेळासाठी पाणी कमी दाबाने सोडण्यात येणार आहे. मात्र कमी दाबाने जरी पाणी आल्यास नागरिकांना त्याचा फटका बसणार आहे. त्यामुळे नागरिकांनी त्यांना पुढील दोन दिवस पुरेल एवढ्या पाण्याचा साठा करुन ठेवण्यास सांगितले आहे.

गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात जून 2019 पर्यंत नागरिकांना पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी पाणी कपातीचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्यावेळी पनवेलकरांना एकदिवस आड पाणी मिळणार असल्याची पूर्वसूचना स्थानिकांना देण्यात आली होती.  परंतु यंदा राज्यात झालेल्या पुरसेशा पावसामुळे  शहराला पाणीपुरवठा करणारे विहार तलाव भरले असून त्यात एकूण पाणीसाठी 85.68 टक्के असल्याची माहिती देण्यात आली आहे.