महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात आज नवी मुंबईच्या बेलापूर न्यायालयाने (Belapur Court) अटक वॉरंट जारी केले आहे. 26 जानेवारी 2014 ला वाशीमध्ये प्रक्षोभक भाषण दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. त्यांच्या भाषणानंतर 30 जानेवारीला मनसे कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्याला (Vashi Toll Naka) तोडफोड केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. दरम्यान याप्रकरणी पूर्वी देखील अटक आणि वारंट जारी करण्यात आली होती मात्र राज ठाकरे न्यायालयात आले नव्हते. आता 6 फेब्रुवारीच्या सुनावणीदरम्यान राज ठाकरे उपस्थित राहणार का? ही उत्सुकता अनेकांच्या मनात आहे.
26 जानेवारी 2014 ला राज ठाकरे यांनी वाशी इथल्या मेळाव्यात टोल नाका बंद करण्याबाबत त्यांच्या ठाकरी अंदाजात भाषण केले होते. त्यानंतर 4 दिवसांतच गजाजन काळे यांनी काही मन सैनिकांसोबत लगेच वाशी टोल नाका फोडला होता. तेव्हा याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात 2018, 2020 मध्येही राज ठाकरे यांच्याविरोधात समन्स आणि वॉरंट काढण्यात आले होते पण राज ठाकरे तेव्हा न्यायालयात आले नव्हते. BMC Election 2021: मुंबई महापालिकेतील सत्ता उलथवून टाकण्यासाठी शक्य ते सर्व करु; राज ठाकरे यांच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांचा शिवसेनेला इशारा.
मनसे सध्या लॉकडाऊनच्या काळात आलेल्या भरमसाठ वीज बीलांच्या विरोधात सरकरविरुद्ध उभी ठाकली आहे. रस्त्यावर उतरून आंदोलन केल्यानंतर, जिल्हाधिकार्यांना पत्र, निवेदनं दिल्यानंतर तसेच अदानी, बेस्ट च्या वरीष्ठांना भेटूनही अद्याप सामान्यांना वीज बिल दरात सवलत मिळत नाही. त्यामुळे याप्रकरणावरून आक्रमक होत अअता मनसेने राज्य सरकार विरूद्ध फसवणूकीच्या गुन्हा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये नोंदवण्यास सुरूवात केली आहे.