Navi Mumbai International Airport (Photo Credits: GVK group)

नवी मुंबईतील नागरिकांना एक खुषखबर मिळत आहे, केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांनी घोषणा केली की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ (Navi Mumbai Airport), एक महत्त्वाचा राष्ट्रीय पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. तो मार्च 2025 पर्यंत व्यावसायिकरित्या कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या विमानतळामध्ये रस्ते, रेल्वे, यासह मल्टीमोडल कनेक्टिव्हिटी असेल, असंही ते म्हणाले. नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (NMIAPL) अदानी समूहाद्वारे बांधलं जात आहे. 31 मार्च 2025 पर्यंत व्यावसायिक कामकाज सुरू करणार आहे. या वर्षी ऑक्टोबरपर्यंत चाचणी उड्डाणे अपेक्षित आहेत. (हेही वाचा - Navi Mumbai Airport: पुढच्या वर्षीपासून कार्यान्वित होणार नवी मुंबई विमानतळ; DCM Devendra Fadnavis यांची माहिती (Watch Video))

या विमानतळाची सुरूवातीच्या टप्प्यात दोन कोटी प्रवासी क्षमता असेल, असा अंदाज वर्तविला जात आहे. गती शक्ती योजनेंतर्गत मल्टिमॉडल कनेक्टिव्हिटी निर्माण करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिजनचा संदर्भ देत सिंधिया म्हणाले की, या विमानतळामध्ये रस्ते, रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिव्हिटी तसेच जल कनेक्टिव्हिटीच्या भविष्यातील योजना असतील.

नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी शनिवारी अदानी समूहाच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष जीत अदानी यांची विमानतळाचा आढावा घेण्यासाठी भेट घेतली. प्रकल्पांच काम जवळपास 55 ते 60 टक्के पूर्ण झालंय. NMIAPL ची मूळ संस्था अदानी एअरपोर्ट होल्डिंग्जने यापूर्वी जाहीर केलेली प्रकल्प पूर्ण होण्याची तारीख डिसेंबर २०२४ होती. ही तारिख तीन महिन्यांनी पुढे सरकली आहे.