राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, (संग्रहित छायाचित्र) (Photo credits: shrad_pawar/facebook)

नुकतीच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2019) राष्ट्रवादी काँग्रेसचे (National Congress Party) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शरद पवार या निवडणुकीत आक्रमक भुमिकेत सर्वांना पाहायला मिळाले आहेत.महत्वाचे म्हणजे, पक्षातून 25 नेत्यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यामुळे पक्ष शक्तीहीन झाल्याची चर्चा सर्वत्र रंगली होती. परंतु, विधानसभा निवडणुकीचा निकालाने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक जागा जिंकल्या आहेत. तसेच, भाजपने या निवडणुकीत कमी जागा मिळवल्या आहेत, याला एकमेव शरद पवार कारणीभूत आहे असेही म्हटले जात आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने 2014 साली 41 जागा जिंकल्या होत्या. लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राष्ट्रवादी पक्षातून एकूण 25 नेत्यांनी भाजप- शिवसेनेत प्रवेश केला. परंतु, शरद पवार यांनी आक्रमक भुमिका मांडून या निवडणूकीत तब्बल 54 जागांवर विजय मिळवला आहे. प्रचार दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती. त्यावेळी म्हणाले होते की, शरद पवार यांच्या पक्षात एकही नेता राहायला तयार नाही. पक्षातील मोठे नेते त्यांना सोडून जात असल्याचे फडणवीस यांनी विधान केले होते. हे देखील वाचा- पत्नी, मुलगा, मुलगी, नातू, पुतण्या, सुनबाईंनी अडवल्या जागा, सामान्य कार्यकर्त्यांची गोची; महाराष्ट्र विधानसभेत पुन्हा एकदा 'घराणेशाही जिंदाबाद'; संपूर्ण यादी

हिंदुस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, विधान निवडणुकीच्या आधी पक्षाने शिवस्वराज यात्रेचा राष्ट्रवादीला मोठा फायदा झाला आहे. तसेच अभिनेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी यात्रेचे नेतृत्व केले होते. अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराजांच्या मालिकेत मुख्य भुमिका साकरली आहे. यामुळेही राष्ट्रवादीच्या जागा वाढल्या आहेत, असाही अंदाज वर्तवला जात आहे. तसेच धनंजय मुंडे आणि अमोल कोल्हे या ओबीसी समाजातील नेत्यांना प्रचारात आघाडीवर ठेवण्याचा शरद पवार यांचा निर्णयही उपयुक्त ठरल्याचे राष्ट्रवादी पक्षाचे नेत्यांनी सांगितले आहे.