राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कोणकणातील प्रमुख नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना (Shiv Sena) पक्षात प्रवेश केला. या वेळी मुळचे शिवसैनिक असलेले भास्कर जाधव आज पुन्हा एकदा स्वगृही आल्याची भावना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बोलून दाखवली. भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाची जोरदार चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात रंगली होती.
'माझा आंतरात्मा शिवसेना पक्षातच'
या वेळी बोलताना, मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केला. माझा कुणाशी वाद नव्हता, माझे राष्ट्रवादीतही कोणाशी भांडण नाही. पण, मी मुळचा शिवसैनिक आहे. त्यामुळे मी गेले काही काळ राष्ट्रवादीत असलो तरी माझा आंतरात्मा शिवसेना पक्षातच होता, अशी भावना भास्कर जाधव यांनी या वेळी व्यक्त केली.
भास्कर जाधव यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा आज सकाळीच राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे जाधव यांनी आपला राजीनामा सोपवला. भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाने आगोदरच भक्कम असलेली शिवसेना कोकणात अधिकच भक्कम होणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र कोकणात मोठा फटका भास्कर जाधव यांच्या रुपाने बसणार आहे. (हेही वाचा, कोकणात शिवसेना अधिक बळकट, राष्ट्रवादीला धक्का; भास्कर जाधव यांचा आमदारकीचा राजीनामा, 'मातोश्री'वर बांधणार शिवबंधन)
दरम्यान, भास्कर जाधव यांचा शिवसेना प्रवेश केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे तर नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षालाही बसणार आहे. कारण, राणे यांचे कार्यक्षेत्रही कोणकच आहे. त्यामुळे येत्या काही काळात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोकणात खास करुन गुहागर येथे शिवसेनेा अर्थातच भास्कर जाधव यांच्याशी संघर्ष करावा लागणार आहे.