Bhaskar Jadhav | (Photo: Facebook)

Maharashtra Assembly Elections: राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाचे कोणक विभागातील महत्त्वाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव ( Bhaskar Jadhav) यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचा (Maharashtra Legislative Assembly) राजीनामा दिला आहे. भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आपला राजीनामा शुक्रवारी (13 सप्टेंबर 2019) सकाळी सोपवला. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला असून, ते आज शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत. हा पक्ष प्रवेश शिवसेना (Shiv Sena) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांचे निवासस्थान 'मातोश्री' येथे पार पडणार आहे.

भास्कर जाधव हे मुळचे शिवसैनिक आहेत. गेली अनेक वर्षे ते शिवसेना पक्षात होते. मात्र, कालांतराने त्यांनी शरद पवार यांचे नेतृत्व मानत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेस केला. तेव्हापासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कोकणातील प्रमुख नेते म्हणून ओळखले जात. आघाडी सरकारमध्ये ते दीर्घकाळ मंत्रीही राहिले आहेत. मात्र, लोकसभा निवडणूक 2014 आणि 2014 तसेच विधानसभा निवडणूक 2014 मध्ये पक्षाचा झालेला पराभव त्यानंतर गेली पाच वर्षे पक्षाची वाटचाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल अनेक नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली आहे. याच पावलावर पाऊल टाकत भास्कर जाधव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला.

भास्कर जाधव राजीनामा पत्र

Bhaskar Jadhav Resignation Letter

भास्कर जाधव हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार हे गेल्या काही दिवसांत जवळपास नक्की झाले होते. मत्र, सध्या वाहत असलेले राजकीय वारे पाहता ते शिवसेना पक्षात प्रवेश करता की भाजप याबाबत उत्सुकता होती. मात्र, कार्यकर्त्यांचा एक जाहीर मेळावा घेत भास्कर जाधव यांन आपण शिवसेना पक्षप्रवेश करत असल्याचे जाहीर केले आणि या उस्तुकतेवर पडदा पडला. (हेही वाचा, भास्कर जाधव यांची 'घरवापसी'; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम, 13 सप्टेंबरला शिवसेना प्रवेश)

भास्कर जाधव यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा विधासभा अध्यक्षकांकडे सोपवला

Bhaskar Jadhav Resigns From Membership OF Maharashtra Legislative Assembly Bhaskar Jadhav Resigns From Membership OF Maharashtra Legislative Assembly

भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मात्र मोठा फटका बसला आहेच. परंतू, जाधव यांच्या नव्या पक्षप्रवेशाने नारायण राणे यांनाही मोठा धक्का बसला आहे. गेले अनेक काळ नारायण राणे हे भाजप प्रवेश करणार अशी चर्चा आहे. मात्र, अद्याप तरी त्याला यश मिळाले नाही. नारायण राणे हे शिवसेनेचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे त्यांनी नेहमीच शिवसेना विरोधात भूमिका घेतली आहे. ही भूमिका कोकणामध्ये काहीशी अधिकच ताठर आणि टोकाची झाल्याचे अनेकदा पाहायला मिळाले आहे. या पार्श्वभूमिवर भास्कर जाधव यांचा शिवसेना पक्षप्रवेश एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि नारायण राणे यांच्यासाठी राजकीय वर्तुळात धक्कादायक मानला जात आहे.