Representational Image (Photo Credits: Facebook)

Armed Robbery in Muthoot Finance office At Nashik: मुथ्थुट फायनान्सवर सशस्र दरोडा घालणाऱ्या आरोपींपैकी या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार याला पोलिसांनी सुरत (Surat) येथून अटक केली आहे. जितेंद्र बहादूर सिंग असे आरोपीचे नाव आहे. तर जितेंद्र हा आंतरराज्यीय टोळी चालवत होता असे पोलिसांनी केलेल्या तपासणीत समोर आले आहे.

टीव्ही 9 ने दिलेल्या वृत्तानुसार, या पूर्वी दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या मोटरसायकली जप्त केल्या होत्या. तसेच चोरी केलेल्या गाड्यांचे चेसी क्रमांक नष्ट करुन त्यांची डिलिव्हरी सुरतला केली जात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले. या प्रकरणाच्या अधिक तपासानंतर एकूण 6 जण असल्याचे समोर आले असून या घटनेच्या मागील म्होरक्याच्या मुसक्या पोलिसांना आवळल्या आहेत.(नाशिक: मुथ्थुट फायनान्स सशस्त्र दरोडा प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात)

काय आहे प्रकरण?

नाशिक शहर उंटवाडी (Untwadi Area of Nashik City) परिसरात असलेल्या मुथूट फायनान्स (Muthoot Finance) शाखा कार्यालयावर शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2019) दुपारी सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते. भरदिवसा घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारीच नव्हे तर, अवघे नाशिक शहर थरारुन गेले.

दरम्यान, पोलिसांनी या दरोड्याचा युद्धपातळीवर तपास सुरु केला. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या दुचाकी गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर प्रमुख आरोपीही लवकरच गळाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता.