नाशिक: मुथ्थुट फायनान्स सशस्त्र दरोडा प्रकरणी दोन संशयित पोलिसांच्या ताब्यात
नाशिक येथील उंडवाडी ((Untwadi Area of Nashik City) ) मुथ्थुट फायनान्स (Muthoot Finance) सशस्त्र दरोडा प्रकरणी दोन संशयीत पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार हे दोन्हीही आरोपी मुळचे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहीती आहे.
Armed Robbery in Muthoot Finance office At Nashik: नाशिक (Nashik) जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या उंडवाडी ((Untwadi Area of Nashik City) ) मुथ्थुट फायनान्स (Muthoot Finance) सशस्त्र दरोडा प्रकरणी दोन संशयीत पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याचे वृत्त आहे. प्राप्त माहितीनुसार हे दोन्हीही आरोपी मुळचे उत्तर प्रदेश राज्यातील असल्याची माहीती आहे.
दरम्यान, टीव्ही 9 या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुथ्थुटफायनान्स कार्यालयावर पडलेल्या सशस्त्र दरोड्यातील संशयीत दोन आरोपी पोलिसांच्या गळाला लागले आहेत. मात्र, या आरोपींबाबत पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती जाहीर केली नाही. तसेच, या वृत्तात दावा करण्यात आला आहे की, पोलीसांना या प्रकरणातील सर्व आरोपी सापडले आहेत. परंतू, सखोल तपास सुरु असल्याने पोलीसांनी गुप्तता बाळगली असून माहिती जाहीर करणे टाळले आहे.
काय आहे प्रकरण?
नाशिक शहर उंटवाडी (Untwadi Area of Nashik City) परिसरात असलेल्या मुथूट फायनान्स (Muthoot Finance) शाखा कार्यालयावर शुक्रवारी (14 फेब्रुवारी 2019) दुपारी सशस्त्र दरोडा पडला होता. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार तर दोघे गंभीर जखमी झाले होते. भरदिवसा घडलेल्या या भयंकर प्रकारामुळे कार्यालयातील कर्मचारीच नव्हे तर, अवघे नाशिक शहर थरारुन गेले. (संदर्भासाही हेही वाचा, मुथ्थुट फायनान्स कार्यालयावर सशस्त्र दरोडा: 1 ठार दोन गंभीर जखमी, नाशिक शहरातील उंटवाडी परिसरातील घटना)
दरम्यान, पोलिसांनी या दरोड्याचा युद्धपातळीवर तपास सुरु केला. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या दुचाकी गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. त्यानंतर प्रमुख आरोपीही लवकरच गळाला लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात होता.
(The above story first appeared on LatestLY on Jun 19, 2019 03:36 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

