नाशिक मुंबई महामार्गाची अवस्था दिवसेनदिवस बिकट होत चाल्ली आहे. काही भागात हा मार्ग अगदी सुपर आहे तर काही भागात रस्त्याची फारच वाईट परिस्थिती झाली आहे. पण रस्त्याच्या या अवस्थेचा त्रास नाशिक मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना होत आहे. किंबहुना लांब पल्याच्या प्रवाशांना देखील हा मार्ग अधिक त्रासदायक ठरत आहे. राज्याची राजधानी आणि देशाची आर्थिक राजधानी मुंबईच्या दिशेने याणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक आहे. पण नाशिक-मुंबई महामार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना हा मार्ग मोठी डोकेदुखी झाली असुन या मार्गावर विविध मोठे अपघात होतानाचं चित्र बघायला मिळत. तरी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्गाच्या 226 कि.मी. लांबीच्या 1830 कोटींच्या प्रकल्पांचा लोकर्पण व कोनशिला अनावरण आज दुपारी इगतपुरी येथे पार आहे. या कार्यक्रमा दरम्यान गडकरींनी नाशिक मुंबई हायवे सहा लेन करण्याचा मानस वक्तव्य केल आहे.
दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर आपल्या फ्रीस्टाईल शैलीत निशाणा साधला आहे. नाशिकच्या रस्त्यामध्ये हा जरी राष्ट्रीय महामार्ग होता, तेव्हा सार्वजनिक बांधकाम भुजबळ मंत्री म्हणून होते, त्याच वेळी सहा लेन मार्ग केला असता तर अडचण आली नसती आणि नागरिकांना आज त्रास सहन करावा नसता लागला असं मंत्री नितीन गडकरी म्हणाले. (हे ही वाचा:- Nitin Gadkari On Old Vehicle: वाहनांना १५ वर्ष पुर्ण झाल्यास गाड्या भंगारात जाणार, प्रदुषण टाळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठी घोषणा; पहा व्हिडीओ)
त्यावेळी दिलेल्या टोलची मुदत 2026 पर्यंत आहे म्हणून त्याची NOC घेतल्याशिवाय नाशिक मुंबई महामार्गाचे काम करता येणार नाही. आता एनओसी घेणं मोठी अडचण आहे किंबहुना भुजबळ यांनी ज्यावेळी महामार्ग बांधला होता, तेव्हाच तो प्रॉब्लेम होता. अर्थात मी भुजबळांना दोष देत नाही, पण मधल्या काळात त्यांनी बरेच वक्तव्य केली होती. भुजबळ आज असते तर बरं झालं असतं पण तरीपण त्यांच्या मनातली भावना आहे, की रोड झाला पाहिजे नाशिक मुंबई महामार्गा बाबतीत कुठलेही राजकारण न करत सरकार या महामार्ग सहा लेन करण्यास प्रयत्नसील असेल अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली आहे.