नाशिक: 'मला तू आवडतेस' म्हणत रिक्षाचालकाकडून छेडछाड, तरुणीने धावत्या रिक्षातून घेतली उडी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नाशिक (Nashik) येथे एका रिक्षात बसलेल्या तरुणीला 'तु मला आवडतेस' असे म्हणत तिची छेडछाड केल्याचा प्रकार घडला आहे. मात्र धावत्या रिक्षातच चालकाने हा संतापजनक प्रकार तिच्यासोबत करत असल्याने तिने आरडाओरसुद्धा केली. परंतु तरीही चालकाने तिच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करत रिक्षा पुढे पळवली.

इंदिरानगर परिसरात एक तरुणी रिक्षात बसून निघाली होती. तेव्हा रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करताच तरुणीचा हात पकडत तु मला आवडतेस असे म्हणून छेडछाड करु लागला. या प्रकारामुळे तरुणीने चालकाला रिक्षा थांबवण्यास सांगितली. परंतु चालकाने रिक्षा न थांबल्याने तरुणीने चालत्या रिक्षामधून उडी घेतली. त्यामुळे तरुणीच्या हाताला आणि चेहऱ्याला गंभीर जखमा झाल्या आहेत.

(अहमदनगर: लग्नाच्या तिसऱ्या दिवशी नवऱ्यासोबत देवदर्शनासाठी गेलीली बायको प्रियकरासोबत पसार)

या प्रकरणी तरुणीने पोलिसात रिक्षाचालकाविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट सांगण्यात आले आहे.