अहमदनगर (Ahmednagar) येथे एखाद्या चित्रपटात प्रेमवीरांचे एकमेकांसोबत लग्न न झाल्यास दुसऱ्या पतीच्या नकळत पळून जाण्याचा कट रचतात त्याच पद्धतीचा प्रकार येथे घडला आहे. तर तीन दिवसांपूर्वी लग्न झालेली बायको आपल्या पतीसोबत देवदर्शनाला आली असता तेथे आलेल्या प्रियकरसोबत पळाल्याची घटना घडली आहे. महिलेचा हा सर्व प्रकार मंदिराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
शेवगाव येथे राहणाऱ्या एका तरुणाचे नुकतेच लग्न झाले होते. त्यामुळे लग्नानंतर देवदर्शनाला जाण्यासाठी ते नवविवाहित दापंत्य एका देवळात गेले. दापंत्यांनी देवाचे दर्शन घेऊन परत येत असताना बायकोचा प्रियकर तिच्या पाठोपाठ चालत होता. परंतु नवऱ्याने त्याची दुचाकीवर जाण्यासाठी पुढे सरसावताच बायको आणि तिच्या प्रियकराने तेथून पळ काढला.
मात्र नवऱ्याला बायको आजूबाजूला दिसत नाही म्हणून त्याने दुकानदारांकडे चौकशीसुद्धा केली. त्यानंतर नवऱ्याने थेट मंदिर समितीला भेट देत त्यांच्या मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यास सांगितले. तेव्हा बायको आपल्या दुचाकीवरुन एका व्यक्तीसोबत पळून जात असल्याचे दिसून आले.तर सीसीटीव्ही फुटेज मधील कॅमेऱ्यात बायकोला एक व्यक्ती खाणाखूणा करत असल्याचे दिसले. त्यानंतर दोघांनी दुचाकीवरुन पळ काढल्याचे नवऱ्याने पाहिले असता त्याला धक्का बसला आहे.