Nashik: बायकोच्या त्रासाला वैतागून घेतला सापाचा मुका; सर्पमित्राचा मृत्यू
Snake Kiss | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

नाशिक (Nashik ) येथे एका धक्कादायक घटनेत सर्पमित्राचा (Snake Friend Died ) मृत्यू झाला आहे. नागेश श्रीधर भालेराव असे या सर्पमित्राचे ((Snake Frien) नाव आहे. त्याने कोब्रा जातीच्या नागाचे चुंबन (Snake Kiss) घेण्याचे अघोरी कृत्य केले. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात एका महाविद्यालायत कोब्रा प्रजातीचा साप आढळून आला. हा साप पकडून त्याच्यासोबत अघोरी कृत्य करतान शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नागेशच्या ओठांना सर्पदंश झाला. सर्पदंश (Snake Bite) झाल्याने त्याचा मृत्यू झाला. नागेश भालेराव हा बायोकच्या सततच्या भांडण आणि त्रासाला कंटाळला होता. त्यामुळे जीवनापासून मुक्ती मिळविण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. नागेश आणि त्याची पत्नी यांच्यात पाठिमागील काही दिवसांपासून वाद होते. या वादातून दोघांमधील मतभेद वाढले होते. या पार्श्वभूमीवर नागेश याने दोन दिवसांपूर्वी एक व्हिडिओ क्लिपही बनवली होती. त्यात आपण जीवाचे काीह बरेवाईट करु असेही त्याने म्हटल्याचे सांगितले जात आहे.

नागेश श्रीधर भालेराव याचा पत्नीशी वाद झाल्यानंतर पाठीमागील काही दिवसांपासून तो घराबाहेरच राहात असे. दोघांमधील वाद प्रचंड विकोपाला गेले होते. त्यामुळे या वादातून नागेश प्रचंड वैतागला होता. नैराश्येतही गेला होता. त्याने एक व्हिडिओ क्लिप बनवत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. या क्लिपमध्ये त्याने म्हटले होते की, पत्नीच्या त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करणार आहे. पत्नीकडून सातत्याने आपल्याला गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात येते आहे. तिच्या सततच्या त्रासाला कंटाळून आपण घर सोडून गेल्याचेही त्याने व्हिडिओत म्हटले होते. (हेही वाचा, Viral Video: नागाचा किस घेणं पडलं महागात, नागाकडून स्टंटबाजाचा करेक्ट कार्यक्रम; पहा व्हिडीओ)

दरम्यान, नागेश भालेराव हा संपूर्ण परिसरात सर्पमित्र म्हणून परिचीत आहे. त्याचे हातावरचे पोट होते. सिन्नर शहरात तो वेल्डिंग वर्कशॉपमध्ये काम आणि होर्डींग्ज चिटकावण्याचा जोडधंदा असे काही करुन तो पोट भरत असे. दरम्यान, नागेशच्या व्हिडिओ क्लिममध्ये लग्नाच्या स्टॅम्प पेपरवर फसवणूक झाल्याचाही त्याने उल्लेख केला आहे. तसेच, पत्नीकडून आपणास व कुटुंबीयांना मानसित्र त्रास दिला जात असल्याचेही सांगताना तो आढळून येतो. या पार्श्वभूमीवर त्याच्या निधनाचे वृत्त आल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.